खाजगी क्लासेसचे सर्वेक्षण करा : आयुक्तांचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील इमारतींचे फायर ऑडीटसोबत आता क्लासेसच्या पार्किंगचाही प्रश्न समोर आला आहे. खासगी क्लासेसचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमारतींचे बांधकाम परवानेही तपासण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिले आहेत.

शहरात खाजगी क्लासेस मोठ्या प्रमाणावर सुरु झालेले आहेत. त्यांनी कोणती परवानगी घेतलेली आहे, हे तपासणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी निवासी वापराच्या इमारतींमध्येच क्लासेसचा व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्‍नही निर्माण होत आहे. या संदर्भात सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. क्लासेस सुरू असलेल्या इमारतीचे परवाने, बांधकाम परवाने, नकाशे, पार्किंगची जागा आदींची माहिती संकलित केली जाणार आहे. सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

शहरात मनपाच्या मोकळ्या जागांवर पार्किंगसाठी प्रयत्न सुरू आहेत. मोकळ्या जागांचा सर्वे करण्यात आलेला आहे. कापड बाजार, नवीपेठ भागांमध्ये पार्किंगसाठी जागा नसल्याने जुन्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पार्किंगची सुविधा करता येईल का, याबाबत प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त-