उध्दव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये, जाणून घ्या यादी

पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच राज्यात कोरोनाचे संकट ओढवलं. या कठीण परिस्थितीतही कोरोनासारख्या महामारीचा सामना करणाऱ्या ठाकरे सरकारची कामाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. एका सर्वेक्षणातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वत्तोम लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत टॉप फाईव्ह मध्ये स्थान पटकावलं आहे. तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी स्थान पटकावलं आहे.

इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तिक रित्या केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला. ‘मूड ऑफ द नेशन’ या नावानं १५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. देशातील वेगवेगळ्या राज्यातील ग्रामीण शहरी नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. त्यांना आपल्या सरकार संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. याआधी जानेवारी महिन्यात असाच एक सर्वे करण्यात आला होता. त्याच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे चांगले काम करत असल्याचे राज्यातील नागरिकांचे मत आहे.

पहिल्या क्रमांकावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता यावेळी आणखी वाढली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १८ टक्के नागरिकांनी योगींच्या कामाचे कौतुक केलं होत. आता २४ टक्के नागरिकांनी त्यांचे काम चांगले असल्याचं सांगितलं आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १५ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ममता बॅनर्जी व नितीश कुमार यांची लोकप्रियता घटल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं. सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेशासित राज्यांचे आहेत.

टॉप फाइव्ह मुख्यमंत्री

१. योगी आदित्यनाथ ( उत्तरपदेश ) – २४ टक्के
२. अरविंद केजरीवाल ( दिल्ली ) – १५ टक्के
३. जगनमोहन रेड्डी ( आंध्रपदेश ) – ११
४. ममता बॅनर्जी ( पश्चिम बंगाल ) – ९ टक्के
५. उद्धव ठाकरे ( महाराष्ट्र ) – ७ टक्के