चर्च सेक्स स्कॅंडल प्रकरणी दोन पादरींची कोर्टापुढे शरणागती

कोट्टायमः (केरळ)-

चर्चमधील सेक्स स्कॅंडल आणि बलात्कार प्रकरणी संशयित असलेल्या चार पादरी पैकी दोघांनी कोर्टापुढे शरनागती पत्कारली आहे. केरळमधील कोट्टायम येथे हा सगळा प्रकार घडला आहे. स्थानिक पोलिसांनी चर्चमधील सेक्स स्कॅंडलनंतर चार पादरींविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. एका पीडितेने आपल्यावर चार पादरींनी बलात्कार करुन ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9bf14a09-9ede-11e8-8e2c-6d8cfbe158ba’]

या प्रकरणानंतर केरळमधील चर्चने पादरींना कोर्टापुढे शरणागती पत्कारण्यास सांगितले होते. त्यानुसार पादरींनी सोमवारी थिरवल्ला जिल्ह्यातील स्थानिक कोर्टापुढे शरणागती पत्कारली असून, जे.के. जाॅर्ज आणि सोनी वर्गीज अशी या दोघांची नावे आहेत. आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुली देण्यासाठी महिला आली असता, चार पादरींनी मिळून तिच्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे. पीडित महिलेच्या पतीने केलेल्या आरोपानंतर चर्चने या चारही जणांना बडतर्फ केले होते. चर्चमध्ये या प्रकरणाची अंतर्गत चाैकशी सुरू आहे.