सूर्यदेवानेही घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन (व्हिडीओ)

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले तीर्थक्षेत्र जेजुरी मूळ स्थान कडेपठार आणि खालील गडावर येथे आज सकाळी पूजेच्या वेळी सूर्यदेवाने ही मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतल्याचे अनुभवास आले. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सुर्यदेवांची किरणे थेट मार्तंड भैरव यांच्या अंगावर पडलेले पाहावयास मिळाली. तसेच मुख्य लिंगावर ही सूर्यकिरणांनी अभिषेक केल्याचे दिसून आले.

आज दि.१७/०९/२०१९ रोजी गाभाऱ्यात सूर्यकिरण थेट भैरवनाथाचे अंगावर पडले तो क्षण पाहण्यासाठी भाविकांनी खूप गर्दी केली होती. या क्षणाचे छायाचित्रही भाविकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपले. सूर्यकिरण थेट गाभाऱ्यात पडल्यामुळे गाभारा पूर्ण उजळून निघाला होता.

येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात भाविकांनी मल्हारी मार्तंड यांचे दर्शन घेतले. देवा तुझी सोन्याची जेजुरी असे पुन्हा अनुभवयास आले. महाराष्ट्रभरातून मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनाही या सुवर्ण क्षणांचा आनंद घेता आला, तसेच या क्षणाचा साक्षीदारही होता आले.