Surya Grahan 2021 : यावर्षी कधी आणि केव्हा होईल सूर्यग्रहण, पहा संपूर्ण यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्याला दरवर्षी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण पाहायला मिळते. हे पृथ्वी आणि चंद्राच्या गतीवर अवलंबून असते. यावर्षी एकूण 4 ग्रहण आहेत, ज्यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे. मे महिन्यापासून त्यास सुरुवात होईल आणि डिसेंबरपर्यंत चालेल. यापैकी 3 ग्रहण आपल्या देशात पहिले जाऊ शकतात.

प्रथम सूर्यग्रहण 10 जून 2021
10 जून रोजी वर्षाचे पहिले सूर्यग्रहण होईल. हे अर्धसूर्यग्रहण असेल. हे सूर्यग्रहण भारत, कॅनडा, रशिया, ग्रीनलँड, युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत दृश्यमान असेल.

डिसेंबरमध्ये वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण
या वर्षाचे दुसरे किंवा शेवटचे सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी होईल. हे दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसून येईल. हे सूर्यग्रहण भारतात पाहायला मिळणार नाही.

वर्षाचे पहिले चंद्रग्रहण
2021 चे पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी होईल. हे चंद्रग्रहण भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पॅसिफिक महासागर प्रदेशात दृश्यमान असेल. भारतात हे अर्धचंद्रग्रहण असेल तर इतर ठिकाणी पूर्ण चंद्रग्रहण असेल.

वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण
या वर्षाचे दुसरे किंवा शेवटचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी होईल. हे अर्ध चंद्रग्रहण भारत, उत्तर युरोप, अमेरिका, पॅसिफिक महासागर आणि ऑस्ट्रेलियामध्ये दृश्यमान असेल.