Surya Rashi Parivartan : कन्या राशीत सूर्य, ‘या’ 7 राशीच्या जातकांच्या वाढणार ‘अडचणी’

पोलिसनामा ऑनलाइन – सूर्य देव 16 सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करत आहेत. सूर्याची स्थिती येथे मजबूत मानली जात नाही. सूर्य येथे बुधासोबत असेल. सूर्याचा राहु, केतु आणि गुरूशी वर्गीय संबंध सुद्धा असेल. सूर्यासोबत ग्रहांचा हा संबंध फारसा चांगला नाही. बहुतांश लोकांना यामुळे समस्या निर्माण होतील. मेष, मिथुन, सिंह, कन्या, तुळ, कुंभ आणि मीन राशीच्या जातकांना या काळात जास्त सावध राहावे लागेल. याचा प्रभाव जवळपास एक महिना राहणार आहे. वेगवेगळ्या राशींवर या परिवर्तनाचा खोलवर परिणाम होणार आहे.

मेष
आरोग्याची काळजी घ्या. संततीबाबत चिंता निर्माण होऊ शकते. एखाद्या मौल्यवान सामानाचे नुकसान होऊ शकते. व्यवसाय वाढवण्याचा या काळात विचार करू नका.

वृष
धनलाभाचे योग आहेत. संपत्तीची समस्या मार्गी लागेल. प्रवासाचे योग आहेत. विवाहित लोकांना या काळात विचारपूर्वक पुढे जाण्याचा सल्ला दिला जात आहे.

मिथुन
कौटुंबिक तणाव टाळा. काम वाढत जाईल. पैशांची स्थिती चांगली राहिल. तुमच्या बहिण-भावांना या गोचर दरम्यान फायदा होऊ शकतो. जर ते नोकरदार असतील तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

कर्क
करियरमध्ये लाभ आणि बदलाचे योग आहेत. आर्थिकस्थिती चांगली राहील. एखादा मोठा निर्णय सुद्धा घेऊ शकता. कार्यक्षेत्रात आणि सामाजिक जीवनात तुमच्या वाणीने लोकांना प्रभावित करू शकता.

सिंह
डोळ्यांची समस्या टाळण्याचा प्रयत्न करा. करियरमध्ये काही सुधारणा होऊ शकतात. संपत्ती किंवा वाहन लाभ होईल. या राशीचे लोक गोचर दरम्यान आपले भविष्य सुधारण्यासाठी बचत करतील.

कन्या
करियर आणि स्थान परिवर्तनाचा योग आहे. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. अचानक होणारा खर्च वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही मेहनत जास्त करत नसाल तर या काळात जास्त करा.

तुळ
कौटुंबिक जीवनाकडे लक्ष द्या. खर्च त्रासदायक ठरू शकतात. प्रवासात सावधगीरी बाळगा. तुळ राशीच्या जातकांनी आपल्या खर्चावर या काळात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या काळात अनावश्यक वस्तू खरेदीवर पैसे खर्च करणे टाळा.

वृश्चिक
करियरमध्ये उन्नती होईल. जबाबदारीचे ओझे वाढेल. संपत्ती आणि धनलाभ होईल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात याकाळात वाढ होईल. तर व्यापार्‍यांना सुद्धा लाभ प्राप्त होण्याची पूर्ण संधी सूर्यदेव देतील.

धनु
करियरमध्ये महत्वपूर्ण बदल होतील. स्थान परिवर्तन होऊ शकते. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्या. सरकारी क्षेत्रातून सुद्धा या राशीच्या जातकांना लाभ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मान सुद्धा या काळात वाढू शकतो.

मकर
आरोग्याच्या स्थितीत सुधारणा होईल. विवाहसंबंधी प्रकरणे चांगली पार पडतील. ऑफिसच्या कामात सावधगीरी बाळगा. या काळात कोणताही प्रवास करणे शक्यतो टाळा. सूर्याच्या गोचरमुळे प्रवासाचा योग्य लाभ मिळणार नाही.

कुंभ
दुखापत आणि अपघातापासून बचाव करा. वाणी आणि राग यावर नियंत्रण ठेवा. पैसे खर्च करणार्‍यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाजूकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या दरम्यान कोणत्याही प्रकारची गुंतवणूक अतिशय विचारपूर्वक करा.

मीन
वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या. गरोदर महिलांनी सावधगीरी बाळगावी. व्यवसायातील नुकसान टाळण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपल्या इच्छशक्तीच्या बळावर काम करण्याची गरज आहे. जरूरी निर्णय घेताना अडचणी येऊ शकतात.