Suryakumar Yadav | ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडीने सूर्यकुमार यादवबद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) गेल्या वर्षभरात T-20 क्रिकेटमध्ये आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या या दमदार कामगिरीचा फायदा T-20 क्रमवारीत सध्या नंबर 1 खेळाडू आहे. सूर्याकडे संपूर्ण मैदानाच्या सर्व दिशांना शॉट लगावण्याची क्षमता आहे. ज्यामुळे त्याला T-20 क्रिकेटचा नवीन मिस्टर 360 म्हणतात. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने सूर्यकुमारबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडी यांनी सूर्यकुमार यादवची तुलना वेस्ट इंडिजचा दिग्गज विव्ह रिचर्ड्स यांच्याशी केली आहे. टॉम मूडी म्हणाला ‘सूर्यकुमार यादव, तो ज्या पद्धतीने खेळतो, ते मनमोहक आहे. हे मला खूप आठवण करून देते… मी तरुण क्रिकेटपटू असताना व्हिव्हियन रिचर्ड्स आवडायचे. असा खेळाडू जो खेळावर एकटाच नियंत्रण ठेवतो.”

सूर्यकुमारचा (Suryakumar Yadav) सध्या फॉर्म बघता बीसीसीआयने त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.
सूर्याकडे नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या T-20 मालिकेचे उपकर्णधारपद देण्यात आले होते.
तसेच आगामी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या T-20 मालिकेसाठी त्याच्यावर पुन्हा एकदा उपकर्णधारपदाची
जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title :- Suryakumar Yadav | tom moody has compared suryakumar yadav to viv richards

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Apurva Nemlekar | बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अपूर्वा नेमळेकरने महेश मांजरेकरांबाबत केले ‘हे’ धक्कादायक विधान

Pune Crime News | रात्री उशिरापर्यंत पबमध्ये ‘डांगडिंग’, कल्याणीनगरमधील हॉटेल एलरो आणि युनिकॉर्न हाऊसवर गुन्हे शाखेच्या ‘सासु’ची कारवाई