Sus-Mahalunge Water Issue | सूस म्हाळुंगे पाणी पुरवठा प्रश्नावर भाजपच्या अमोल बालवडकरांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sus – Mahalunge Water Issue | महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी सुस (Sus) म्हाळुंगे (Mhalunge) या गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात भाजपचे अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी पी. एम. आर. डी. ए. (PMRDA) व पुणे मनपा Pune Municipal Corporation (PMC) विरोधात उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका दाखल (Pune News) केली आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ॲड. सत्या मुळे (Adv. Satya Muley) यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. (Sus – Mahalunge Water Issue)

 

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 23 गावांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये सुस, म्हाळुंगे या गावांचाही समावेश आहे.
या गावांमध्ये नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी (Basic Facilities) रोज झगडावे लागत आहे.
येथे पाणी प्रश्न (Water Issue) अतिशय बिकट असून या संदर्भात पी. एम. आर. डी. ए व पुणे मनपा (PMC) या दोन्ही नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी अपयशी ठरले असल्याने माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल केली आहे. (Sus-Mahalunge Water Issue)

 

जनहित याचिकेतील प्रमुख मुद्दे

1. सूस आणि म्हाळुंगे गावांना पाणीपुरवठा (Water Supply) होत नसल्याच्या समस्येवर गांभीर्य ओळखण्यात पी. एम. आर. डी. ए आणि पीएमसी दोन्ही अपयशी ठरले आहेत.

2. पीएमआरडीए आणि पीएमसीने या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी कोणताही कृती आराखडा (Action Plan) राबविण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

3. सूस आणि म्हाळुंगे येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कोणाची आहे ? याचा स्पष्टपणे खुलासा करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी दोघेही पुढे येत नाहीत.

4. पीएमआरडीएने या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणताही आराखडा तयार न करता किंवा कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकास न करता निवासी इमारतींच्या (Residential Building) नवीन बांधकामांना (New Construction) परवानगी (Permission) दिली जात आहे.
जर पीएमआरडीए पाणीपुरवठ्यासाठी तरतूद करु शकत नसेल तर पीएमआरडीएने या गावातील नवीन बांधकामांना परवानग्या देणे बंद करावे.

5. या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी यांच्यात कोणताही संयुक्त विभाग कार्यरत नाही.

 

अमोल बालवडकर यांनी सांगितले की,
सूस आणि म्हाळुंगे येथील रहिवाशांच्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व ती समस्या सोडवण्याची जबाबदारी कोणत्या प्राधिकरणाची आहे.
हे निश्चित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात मी जनहित याचिका दाखल केली आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :-  Sus-Mahalunge Water Issue | petition of former bjp corporator amol balwadkar in court for water issue of 23 villages including sus mahalunge

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा