Sushama Andhare | सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरुन वारकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा; म्हणाले-‘ज्या पक्षात अंधारे असतील त्या पक्षाला…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे गटात (Uddhav Thackeray Group) अगदी थोड्या काळात महत्वाच्या पदावर पोहचलेल्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या काही जुन्या व्हिडीओमुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे. हे व्हिडीओ गेले काही दिवस सामाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे (Sushama Andhare) हिंदू देवी देवतांचा अपमान करताना दिसत आहेत. त्यांचा असा व्हिडीओ प्रसारित होताच अनेक वारकरी संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यास सुरूवात झाली आहे. सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान करणार नाही, अशी भूमिका विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे (Ganesh Maharaj Shete) यांनी घेतली आहे. तसेच, सुषमा अंधारे यांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
प्रभू राम, श्रीकृष्ण, संत ज्ञानदेव यांच्यावर अंधारे यांनी अवमानाजनक वक्तव्य केली आहेत, असे सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी तक्रार महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे (Damuanna Maharaj Shingane) यांनी पोलीस ठाण्यात दिली. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात सुषमा अंधारे यांचा हिंदू देवी-देवता आणि साधुसंताबद्दल वादग्रस्त विधानांचा व्हिडिओ प्रसारित होत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असेही ते म्हणाले.
सुषमा अंधारेंचे (Sushama Andhare) विधान समोर आल्यानंतर आळंदी येथे वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांना चपलेचा हार घातला.
आळंदीचे किर्तनकार महेश मडके पाटील (Mahesh Madke Patil) यांच्या नेतृत्त्वात झालेल्या आंदोलनात वारकऱ्यांकडून अंधारे यांना उत्तर देण्यात आले.
संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा असा सल्ला वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंना दिला.
सुषमा अंधारेंचे अशी विधाने समोर आल्यानंतर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Web Title :- Sushama Andhare | warkari community is aggressive against shivsena sushma andhare
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Vaidyanath Co Operative Bank | पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ सहकारी बँकेवर आरबीआयची कारवाई
Pune PMC News | अग्निशमन सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे