SSR Case : रिया केवळ लुबाडण्याचा उद्देशानं सुशांतच्या संपर्कात, बिहार पोलिसांकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सीबीआय आणि ईडीने आपला तपास सुरू केला आहे. गुरुवारी सीबीआयने सुशांत सिंह राजपूत केसमध्ये एफआयआर दाखल केला. ज्यामध्ये रिया चक्रवर्तीसह 6 लोकांना आरोपी करण्यात आले आहे. तपासासाठी सीबीआयने एसआयटीची स्थापना केली आहे. या टीमचे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर नेतृत्व करत आहेत. सुशांत केसमध्ये ईडीने रिया चक्रवर्तीला 7 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले आहे. रियाला तिची प्रॉपर्टी आणि सुशांतसोबत आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी केली जाऊ शकते.

बिहार पोलिसांनुसार, रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाच्या सदस्यांचा सुशांतच्या संपर्कात येणे हा केवळ लुबाडण्याचा उद्देश होता. नंतर त्यांनी सुशांतच्या मानसिक आजाराचे खोटे चित्र तयार केले. बिहार पोलिसांनी सुशांतला आपल्या घरी नेऊन औषधाचा ओव्हर डोस दिल्याचा सुद्धा गंभीर आरोप केला आहे.

आज ईडीच्या समोर हजर होणार नाही रिया
रिया चक्रवर्तीला आज म्हणजे शुक्रवारी ईडीच्या समोर हजर व्हायचे होते. परंतु, आता ती ईडीसमोर हजर होणार नाही. रियाने सुप्रीम कोर्टात सुनावणीचा संदर्भ देत विनंती केली आहे की, तोपर्यंत तिचा जबाब घेतला जाऊ नये. रियाला ईडीचे समन्स व्हॉट्सअपवर मिळाले होते, तिने याचे उत्तर ईडीला मेल केले आहे.

सुशांतच्या मॅनेजरीची चौकशी
ईडीने सुशांत सिंह राजपूतची बिझनेस मॅनेजर श्रुतीला समन्स पाठवले आहे. शुक्रवारी म्हणजे आज तिला ईडी समोर हजर होऊन जबाब नोंदवावा लागेल. श्रुती मोदीचे नाव पाटणामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आहे. गुरुवारी सीबाीआयने जो एफआयआर दाखल केला आहे, त्यामध्ये सुद्धा श्रुतीचे नाव आहे.