रिया चक्रवर्तीच्या विरोधात जारी होऊ शकते लुकआऊट नोटीस, पोलिसांना मिळाले महत्वाचे ‘धागेदोरे’

पाटणा : वृत्तसंस्था –  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती अडकत चालली आहे. मिळलेल्या वृत्तानुसार बिहार पोलीस या प्रकरणात रियाच्या विरूद्ध लुकआउट नोटीस जारी करण्याबाबत विचार करत आहेत. बिहार पोलिसांना रिया चक्रवर्तीविरूद्ध काहीतरी मोठे पुरावे हाती लागले आहेत. अशावेळी तिची चौकशी करणे आवश्यक आहे. असेही वृत्त आहे की, पोलिसांचा रिया चक्रवर्तीशी संपर्क होऊ शकलेला नाही. फोनवर सुद्धा तिच्याशी बोलणे होऊ शकलेले नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार रिया बेपत्ता आहे.

रियाविरूद्ध लुकआउट नोटीस
मागील काही दिवसापासून बिहार पोलीस सुशांत आत्महत्या प्रकरणात खुप वेगाने काम करत आहेत. अनेक लोकांचे जबाब घेऊन केस योग्य दिशेने पुढे घेऊन जात आहेत. मंगळवारी सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के सिंह यांनी रिया चक्रवर्तीच्या विरूद्ध एफआयआर दाखल केली होती. असे म्हटले जात आहे की, रिया मोठ्या कालावधीपासून सुशांतचा मानसिक दृष्ट्या छळ करत होती. तिच्यावर सुशांतला घरच्यांपासून दूर केल्याचा सुद्धा आरोप आहे. रियाने सुशांतला ब्लॅकमेल केल्याची बाबही समोर आली आहे. याच धागेदोर्‍यांच्या आधाराने तपास करत आतापर्यंत रियाच्या विरूद्ध बिहार पोलिसांच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. परंतु, या लुकआउट नोटीसवरून रियाचे वकील सतीश यांनी वेगळेच वक्तव्य केले आहे. त्यांच्यानुसार रियाला किंवा त्यांना कोणतीही लुकआउट नोटीस पाठवण्यात आलेली नाही. वकीलानुसार रियाच्या घरीदेखील कुणीही आलेले नाही.

ईडीने सुद्धा सुरू केली चौकशी
या प्रकरणात ईडीने सुद्धा तपास सुरू केला आहे. मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करून रिया आणि तिच्या कुटुंबाविरोधात ईडी तपास करत आहे. इंडिया टुडेने सुद्धा सुशांतच्या बँक अकाऊंटच्या डिटेल्स मिळवल्या आहेत, ज्या पाहिल्यानंतर स्पष्ट होते की, रिया चक्रवर्तीच्या मेकअप आणि शॉपिंगवर मोठी रक्कम खर्च केली गेली आहे. अ‍ॅक्ट्रेसच्या भावासाठी सुद्धा खर्च करण्यात आला आहे. आता रिया चक्रवर्तीचा जबाब बिहार पोलीस कधी नोंदवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून ही केस मुंबईत शिफ्ट करण्याची मागणी केली आहे. एकाच प्रकरणात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तपास होऊ शकत नाही, असे याचिकेत म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like