…म्हणून ED च्या चौकशीपूर्वी रियाने केली ‘ही’ मागणी !

पोलिसनामा ऑनलाईन – अमंलबजावणी संचालनालयाने ईडीने सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली होती. त्यानुसार आज तिची चौकशी होणार आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने केल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये अशी विनंती केल्याचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले आहे. सुशांतच्या खात्यामधून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे याच प्रकरणी रियाची आज चौकशी होणार आहे. दरम्यान, सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असल्याचे नमूद केले आहे. सुशांतच्या खात्यामधील 15 कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे चौकशीसाठी आज रियाला ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.