सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीने केला होता शवागराचा दौरा ? अनेक प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत, जे केसचे समीकरणच बदलत आहेत, सोबतच पोलीस कारवाईवर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकतेच एका न्यूज पोर्टलने स्टिंग ऑपरेशन करून असा खुलासा केला आहे, ज्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

एका न्यूज पोर्टलने दावा केला आहे की, सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने त्या शवागराचा दौरा केला होता, जेथे सुशांतची डेडबॉडी ठेवण्यात आली होती. सांगण्यात आले होते की, सुशांतचे कुपर रूग्णालयात पोस्टमार्टेम झाले होते. या वृत्तानुसार रियाने त्याच रूग्णालयाचा दौरा केला आणि तेथे 45 मिनिटे घालवली होती. आता हैराण करणारी बाब ही आहे की, रियाला शवागरात जाण्याची परवानगी कशी मिळाली. ज्या ठिकाणी सुशांतच्या कुटुंबियांना सुद्धा जाऊ दिले नाही, तेथे रिया कशी उपस्थित राहिली?

न्यूज पोर्टलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शवागराचा एक अधिकारी सांगतो की – रियाला बेकायदेशीर प्रवेश मिळाला होता. असेही सांगितले जात आहे की, तिला या कामात मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळाले होते. जर हे स्टिंग ऑपरेशन खरे सिद्ध झाले तर रियाच्या अडचणी वाढतीलच, सोबतच मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जातील.

या वादावर सुशांतचे वकील विकास सिंह यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी या गोष्टीवर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, कोणत्या आधारावर रियाला शवागरात जाण्याची परवानगी दिली गेली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जी रिया स्वत: सुशांतला आठ जूनला सोडून गेली होती, ती त्याच्या मृत्यूनंतर शवागरात का गेली. आता रियाच्या वकीलाकडून या वादावर कोणती प्रतिक्रिया येते, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.