SSR Death Case : रिया अन् तिच्या भावाला होवू शकते अटक, ड्रग पेडलरशी थेट कनेक्शन असल्याचं समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूत प्रकरणासंदर्भात सोमवारी एक मोठी माहिती समोर आली आहे. ड्रग अँगल समोर आल्यानंतर रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्यावर संशय होता. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. एनसीबीने सोमवारी मुंबईत दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशी दरम्यान रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकचा या ड्रग पेडलरशी डायरेक्ट संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

एनसीबीच्या टीमला रियाच्या विरोधात आणखी काही पुरावे जमा करायचे आहेत, जेणेकरून रियाला जमानत मिळायला नको. टाइम्स नाउच्या रिपोर्टनुसार, एनसीबीच्या टीमने ज्या दोघांना अटक केली आहे त्यांचा डायरेक्ट संबंध रिया आणि तिचा भाऊ शोविकशी आहे. त्यामुळे रिया आणि तिच्या भावाला अटक होऊ शकते.

ड्रग पेडलरच्या संपर्कात बॉलिवूडचे अनेक नामवंत चेहरे

अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलरच्या चौकशीदरम्यान माहिती समोर आली की रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक सोबतच बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांचं देखील या ड्रग पेडलरशी डायरेक्ट कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ड्रग पेडलरने सांगितलं की बांद्रा, जुहू, लोखंडवाला या भागात होणाऱ्या पार्टीमध्ये ड्रगचा वापर केला जातो. रियावर ड्रगचा वापर आणि डील केल्याचा आरोप आहे.

रियाची चौकशी सुरु

इकडे सीबीआय देखील रियाची चौकशी करत आहे. रविवारी सीबीआय अधिकाऱ्यांनी रियाची तब्बल नऊ तास चौकशी केली, शनिवारी सात तास आणि शुक्रवारी दहा तास अशी तिची चौकशी करण्यात आली. गुरुवारपासून सीबीआय शोविकची चौकशी करत आहे. या प्रकरणा संदर्भात मुंबई पोलिसांनी देखील रियाची चौकशी केली होती.