जॅकलीन आणि सुशांतचं नवं पार्टी साँग ‘मखना’ रिलीज ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस लवकरच सुशांतसिंग राजपूत सोबत काम करताना दिसणार आहे. ड्राईव्ह या सिनेमातून एक नव्या अंदाजात ही जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहेत. नुकतंच या सिनेमातील मखना हे साँग रिलीज झालं आहे. या गाण्यात दोघांचीही चांगली केमिस्ट्री दिसत आहे. या गाण्याचं म्युझिकही सुंदर आहे, ऐकून तुमचेही पाय थिरकतील. सुशांत-जॅकलीनचं हे पार्टी साँग असून चाहत्यांना खूपच आवडलं आहे.

मखना या गाण्यात सुशांत आणि जॅकलीनची नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मखना सिनेतमातील रिलीज करण्यात आलेलं हे पहिलं गाणं आहे. ओझिल दलाल आणि तनिष बागची यांनी हे गाणं लिहलं आहे. वीकमधील टॉप 5 साँगमध्ये मखना हे साँग लिडिंगला दिसत आहे. तनिष बागची, यासेर देसाई आणि असिस कौर यांनी हे गायलं आहे. तनिष बागचीनेच हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. सध्या हे गाणं खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

या साँगव्यतिरीक्त मरजावा सिनेमातील तुम ही आना तसेच वॉर सिनेमातील घुंगरू, ड्रीमगर्ल सिनेमातील राधे राधे, पल पल दिल के पास सिनेमाचे शीर्षकगीत ट्रेंडिंग ट्युनमध्ये आहे. तरीही सर्वा गाण्यांमध्ये मखना गाणं मात्र सध्या ट्रेडमध्ये आहे. कारण तरुणाईची आणि नेटकऱ्यांची पहिली पसंती या गाण्यालाच आहे.

 

 

Visit : Policenama.com