अबब ! प्रति महिना ‘एवढे’ लाख होतं सुशांतच्या घराचं ‘भाडं’, ‘डिपॉझिट’ची तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत ! जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे.

सुशांत ज्या डिलक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. इथं एकूण चार प्लॅट होतं. घरासाठी सुशांत एवढं भाडं द्यायचा ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मीडिया रिपोर्टानुसार, या घरासाठी सुशांतनं 12 लाख 90 हजार रुपये (12,90,000) एवढं डिपॉझिट दिलं आहे. घराच्या रेंटबद्दल बोलायचं झालं तर या घरासाठी तो प्रति महिना 4 लाख 51 हजार रुपये (4,51,000) एवढं भाडं देत होता. अशीही माहिती समोर आली आहे की, सुशांत 2022 पर्यंत या घरात राहणार होता.

सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन
मुलाचं(सुशांतचं) अंतिम दर्शन घेण्यासाठी सुशांतचे वडिल आणि कुटुंबातील इतर सदस्य दुपारी मुंबईत पोहोचले होते. व्हिले पार्लेमधील पवन हंस स्मशान भूमीत सुशांतला अंतिम निरोप देण्यात आला.

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं सुशांतच्या अंतिम संस्कारात जास्त लोक सहभागी होऊ शकले नाहीत. सुशांतचे वडिल आणि इतर काही जवळची लोकंच यावेळी उपस्थित होती. अखेर आज सुशांत अनंतात विलीन झाला आहे.