रिया ड्रग्स केस : सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकूल प्रीत यांची होणार चौकशी, NCB पाठवणार नोटीस

मुंबई : वृत्तसंस्था –  अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) तपास करत आहे. या आठवड्यात NCB सारा अली खान, श्रद्धा कपूर, ,सिमोन खंबाटा आणि रकुल प्रीत यांना नोटीस पाठविणार आहे. या चार अभिनेत्रींना चौकशीसाठी नोटीस पाठविली जाईल. वास्तविक, एनसीबीचा असा दावा आहे की सुशांतची गिर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने या चार अभिनेत्रींची नावे दिली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार रिया चक्रवर्तीने सिमोन खंबाटा, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान यांची नावे घेतली. असे सांगितले जात आहे की, रकुल, सारा आणि रिया मुंबईत एकाच जिममध्ये असत आणि तिथे त्यांची मैत्री झाली होती. यामुळेच एनसीबीला चौकशीत पुढाकार मिळाला आणि त्यांच्याकडे सखोल माहिती देखील आहे. तसेच रियाने श्रद्धा कपूरचेही नाव घेतले आहे. अशा परिस्थितीत श्रद्धाला समन्सही पाठविला जाऊ शकतो.

अलीकडेच राहिल विश्राम नावाच्या मुंबईतील ड्रग पेडलरला पकडले गेले होते आणि आता त्याच्या टोळीचा शोध घेण्यात येत आहे. रियाने सांगितले होते की सुशांत तिला भेटण्यापूर्वी गांजा घेत असे. तिने सांगितले की केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगवर त्याने अधिक ड्रग घेणे सुरू केले होते. असंही म्हटलं जात आहे की गांजाने भूक जास्त लागते आणि केदारनाथच्या शूटनंतर सुशांत आणि साराचं वजन वाढलं होतं.

आता एनसीबी अनेकांना बोलावून त्यांची चौकशी करेल आणि बॉलिवूडचे कनेक्शन उघड करेल. सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत ड्रग्जचे प्रकरण पुढे आले. एनसीबी वेगाने या प्रकरणाचा तपास करत आहे. बॉलिवूड ड्रग्जच्या कनेक्शनची झपाट्याने चौकशी केली जात आहे. आता कोणत्या नवीन गोष्टी समोर येतात हे पाहावे लागेल.