‘सुशांत सिंह राजपूत सुसाईड केस’ला नवं वळण ! नेपोटिझमची ‘वकिली’ करणार्‍या ‘या’ बड्या दिग्दर्शकाची होणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्याच्या आत्महत्येमुळं पूर्ण देश हादरला होता त्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी आतापर्यंत 30 लोकांची चौकशी केली आहे. अद्यापही त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. आता अशी माहिती आहे की, काही दिग्गजांचीही चौकशी केली जाणार आहे आणि काही लोकांचा जबाबही नोंदवला जाणार आहे. काहींची पुन्हा एकदा चौकशी केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांची चौकशी होणार आहे. अद्याप त्यांना समन्स बजावण्यात आलेला नाही. अशीही माहिती आहे की, यश राज फिल्म्सची कास्टींग डायरेक्टर शानू शर्माचीही चौकशी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती कास्टींग डायेरक्टर म्हणून काम पहात आहे.

या लोकांचे नोदंवले जातील जबाब
या प्रकरणी काही लोकांची चौकशी तर नाही होणार परंतु त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यांचं मत विचारलं जाणार आहे. यात कंगना रणौत आणि डायरेक्टर शेखर कपूर यांचा समावेश आहे. कारण या लोकांनी सुशांत नेपोटीजमला बळी पडल्याचं म्हटलं होतं.

‘आत्महत्या नव्हे तर हत्या’
अनेकांनी आरोप केला आहे की, सुशांतची हत्या झाली आहे. यात सुशांतच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एक आहे आणि भाजप आमदार नीरज सिंह बबलू यांचंही असंच म्हणणं आहे. काँग्रेस नेते संजय निरूपम म्हणाले होते की, छिछोरे सिनेमा हिट झाल्यानंतर त्यानं 7 सिनेमे साई केले होते. परंतु नंतर यातले काही सिनेमे काढून घेण्यात आले.

आत्महत्येच्या वेळी घरातच होता मित्र
सुशांतचा जवळचा मित्र सिद्धार्थ पिटानी हा आत्महत्येवेळी घरातच होता. त्यामुळं बुधवारी त्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. सिद्धार्थ क्रिएटीव्ह कंटेट मॅनेजर म्हणूनही सुशांतचं काम पहात होता.

आत्महत्येचं कारण अस्पष्टच
आतापर्यंत सुशांतचा पोर्ट मॉर्टेम रिपोर्ट आणि विसेरा रिपोर्टमधूनही हीच माहिती समोर आली आहे की, त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परंतु त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं आहे याचा मात्र सुगावा अद्याप पोलिसांना लागलेला नाही.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता.