सुशांतची Ex मॅनेजर दिशाचा बलात्कार करून खून झालाय, माझ्याकडे तिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट’ : नारायण राणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असा गंभीर आरोप भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राज्य सरकार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल झालेली नाही असंही ते म्हणाले आहेत. इतकंच नाही तर सुशांतची एक्स मॅनेजर दिशा हिचाही बलात्कार करून खून करण्यात आला आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी या सर्व विषयावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करत अनेक गंभीर आरोप केले आहेत.

सुशातंची मॅनेजर दिशाबद्दल बोलताना राणे म्हणाले की, “सुशांतची मॅनेजर दिशा सलियान हिनं आत्महत्या केली. या प्रकणाचा तपास का झाला नाही. तिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट माझ्याकडे आहे. तिची आत्महत्या नसून तिचीही हत्याच झाली आहे. तिचा बलात्कार करून तिला ठार मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगात जखमा होत्या. यावरून तिचा बलात्कार झाला आहे” असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. निष्पाप मुलीचा खून करण्याचे राज्य सरकारला लायसन्स दिले नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

सुशांतबद्दल बोलताना नारायण राणे म्हणाले, “सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कुणालातरी वाचवण्यासाठी सरकार चौकशीत टाळाटाळ करत आहे. सुशांत सोबत 13 आणि 8 तारखेच्या पार्टीत कोण होतं हे मुंबई पोलिसांना माहित नाही का ? सगळ्या गोष्टी लपवल्या जात आहेत. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सरकार काम करत आहे. रियाला शोधून चौकशी करायला हवी. दिनो मोरियाच्या घरी पार्टीला मंत्री काय करतात ?” असा सवाल देखील राणे यांनी केला आहे.

पुढे बोलताना राणे म्हणाले, “सुशांतची आत्महत्या नसून हत्याच आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेनं नाही. पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केली नाही. परंतु बिहारमध्ये मात्र एफआयआर दाखल झाली आहे. गेल्या 50 दिवसात मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध का घेतला नाही ?” असा सवालही राणेंनी केलाय.

सुशांतच्या आत्महत्येनंतर ठराविक रुग्णवाहिकाच का बोलावली आणि ती ठराविक हॉस्पिटललाच का नेली ? दिनो मोरिया कोण आहे ? त्याच्या घरी मंत्री का जातात ? अधिकारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत ? सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पार्टी सोडून का गेली होती ? सुशांतला धमकी दिली जात होती हे मुंबई पोलिसांना माहिती नव्हतं का ? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

इतकंच नाही तर सुशांतचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आपल्याकडे आहे असा दावाही त्यांनी केला आहे. हा रिपोर्ट ते मुंबई पोलीस आयुक्तांकडे देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like