‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या आहे’, सुशांतच्या वडिलांच्या वकिलानी दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेली 4-5 महिन्यांपासून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर देशात खूप मोठं राजकारण पाहायला भेटलं आहे. आता या प्रकारणाबद्दल सुशांतच्या वडिलांनी सुशांतची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध खटला दाखल झाला पाहिजे असं त्यांच्या वकिलाला सांगितलं आहे. सीबीआयच्या तपासात कोणत्याच गोष्टींचा उलघडा झाला नसल्यामुळे आपण नाराज असल्याचेही सुशांतचे वडील म्हणाले आहे. विकास सिंह पुढे बोलताना म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी एम्सच्या एका डॉक्टरकडे फोटो पाठविले होते, जे नीतूचे स्वत:चे काढलेले फोटो होते. ते फोटो पाहून डॉक्टर म्हणाले की हा आत्महत्या असू शकत नाही.

” डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितले की ही 200 टक्के हत्या आहे. म्हणूनच, हे प्रकरण आत्महत्यापासून ते हत्येमध्ये रूपांतरित करण्यात सीबीआयला अडचण येत असल्याचे समजलेले नाही? आत्तापर्यंत सीबीआयने जो तपास केला त्याविषयी एकही पत्रकार परिषदही घेतली नाही. ज्या वेगाने हा खटला चालू आहे त्याबद्दल मी समाधानी नाही.” सुशांतच्या वडिलांचे वकील यावर म्हणाले, “आज एम्सची टीम बसली होती. सीबीआय देखील 5-6 दिवसांपासून आली आहे, परंतु त्या लोकांच्या बैठका बोलवल्या गेल्या नाहीत.”

सुशांतचे प्रकरण पडतेय बाजूला –
सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी सुशांतच्या प्रकरणात ड्रग्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीवरही प्रश्न विचारला आणि असं सांगितले की ही नवीन प्रकरणे समोर आणून सत्य उघडणार नाही. ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान यांच्यासह अनेक मोठ्या तारकांची नवे आली आहेत. याबद्दल विकास सिंह म्हणाले की, एनसीबीही मुंबई पोलिसांप्रमाणे नुसतं विषय सोडून तपास करत आहे.”

सुशांतच्या मृत्यूचा खुलासा कसा होणार ?
सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी सांगितले की, आरोपी रिया चक्रवर्ती म्हणाली की जर ती सुशांत सिंगसाठी ड्रग्ज विकत घ्यायची तर ती नेमकी सुशांतच्या सांगण्यावरून घ्यायची का ती स्वत: घ्यायची? ती सुशांतला ड्रग कशी द्यायची याबद्दल आता काहीच खरं कळू शकणार नाही.’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like