निधनाच्या एक दिवस आधी सुशांत सिंह राजपूतचं ‘या’ सिनेमावर काम करण्याचं होतं मन !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. अशात आता सुशांतबद्दल एक नवीन खुलासा समोर आला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूआधी एका खास सिनेमावर चर्चा करत होता.

सुशांत सिंह राजपूतनं त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी या सिनेमासंदर्भात मेकर्ससोबत बातचित केली होती. सुशांत, डायरेक्टर निखिल आडवाणी (Nikkhil Advani) च्या सिनेमात काम करण्याच्या तयारीत होता. असं सांगितलं जात आहे की, हा सिनेमा 26/11 हल्ल्यावर आधारित असणार होता. या सिनेमाला घेऊन सुशांत खूप उत्साही होता.

या सिनेमाला घेऊन सुशांतची 13 जून रोजी टॅलेंट एजन्सीच्या उदय सिंह गौरीसोबत बातचित झाली होती. गौरीनं फिल्ममेकर निखिल आडवाणी, प्रोड्यूसर रमेश तौरानी (Ramesh Taurani) आणि सुशांत यांचं आपापसात बोलणं करवून दिलं होतं. असं सांगितलं जात आहे की, हा कॉन्फरन्स कॉल होता. चौघांची 7 मिनिटे चर्चा झाली होती जी जास्त काळ नव्हती.

यादरम्यान सुशांतनं मेकर्ससोबत आपली जिज्ञासा आणि कशा प्रकारे त्याला हा सिनेमा करायचा आहे हे शेअर केलं होतं. सोबतच या प्रकरणी सविस्तर बोलण्यासाठी डेटही फिक्स करण्यात आली होती. यानुसार 15 जून रोजी त्यांच्यात पुन्हा एकदा यावर चर्चा होणार होती. परंतु त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे 14 जून रोजी सुशांतचं निधन झालं.

You might also like