सुशांतच्या मृत्यूला 60 दिवस पुर्ण, Ex गर्लफ्रेन्ड अंकितानं लिहीलं – ‘जिथं असेल तिथं खुश असणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज दोन महिने पूर्ण झाली. सुशांत 14 जून 2020 रोजी मुंबई येथील आपल्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आला होता. आता सुशांत सिंहची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने एक पोस्ट लिहिली आहे. “दोन महिने झाले सुशांत आणि मला माहित आहे की तू जिथे कुठे आहेस तिथे खुश असशील. 15 ऑगस्ट रोजी 10 वाजता होणाऱ्या ग्लोबल प्रेअर मध्ये सर्वांनी सहभागी व्हा” असं अंकिताने लिहिलंय.

सुशांत केसमध्ये सीबीआय चौकशीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. अंकिता लोखंडेनेही सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. व्हिडीओ मध्ये अंकिता म्हणाली की, सुशांतसोबत नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्याचा अधिकार सर्वाना आहे. आणि सुशांतला न्याय मिळाला पाहिजे. सुशांतच्या परिवारासोबत मिळून सर्वांनी एक मोहीम हाती घेतली आहे. सुशांतच्या बहिणी कीर्ती आणि श्वेता लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

अंकिताने ट्विटर वर एक फोटो शेअर करत लिहिलं, “सुशांतसिंह राजपूतसाठी 24 तासांची एक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे, सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा जेणेकरून सत्य टिकून राहील आणि सुशांतला न्याय मिळेल.” अंकिताने देखील ग्लोबल प्रेयर मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन लोकांना केले आहे. अंकिता आणि सुशांत 6 वर्षे रिलेशनशिप मध्ये होते. पण काही वैयक्तिक कारणामुळे ते एकमेकांपासून लांब गेले. हे दोघे पवित्र रिशता या मालिकेत एकत्र काम करत होते. ही मालिका खूप गाजली होती.