‘त्या’ अभिनेत्रीसोबतच्या अफेअरबाबत सुशांत सिंह राजपूत ‘बोलला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचं नाव सतत ॲक्ट्रेस रिया चक्रवर्तीसोबत जोडलं जात आहे. दोघांनीही याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिली नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे एकत्र स्पॉट होत आहेत. अशातच अफेअरच्या चर्चेवर सुशांतने वक्तव्य केलं आहे. सुशांतचं म्हणणं आहे की, लोकांनी सुरुवातीपासूनच चर्चा नव्हती करायला हवी.

https://www.instagram.com/p/By6eatLHPwW/?utm_source=ig_embed

एका मुलाखतीत बोलताना सुशांत म्हणाला की, “सध्या काहीही म्हणणं बरोबर नाही. लोकांनी इतक्या लवकर कोणता अंदाज लावायला नको होता. खास करून मी कोणाशी जोडला गेला यावर तर मला बोलायचंच नाही. मी फक्त त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो ज्याचा संबंध फक्त माझ्याशी आहे. जर कोणासोबत रिलेशनचा विषय असेल तर मला पहिल्यांदा त्या दुसऱ्या व्यक्तीची परवानगी घ्यायला लागेल.”

सुशांतला जेव्हा विचारण्यात आलं की, तो कोणाला डेट करत आहे का ? यावर उत्तर देताना सुशांत मजेशीर अंदाजात म्हणाला की, “मी तर अनेक लोकांना डेट करत आहे. बहुतेक मी हे सांगायला नको होतं. अरे कोणी आणखी नाही तर मी स्वत: हे म्हणत आहे. मला असं म्हणायला नको होतं का ?”

सुशांतचं नाव रिया चक्रवर्तीआधी अभिनेत्री कृती सेनन सोबतही जोडलं गेलं होतं. सुशांत अभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत दीर्घकाळ रिलेशनमध्ये होता. विषय लग्नापर्यंतही पोचला होता परंतु अचानक दोघे वेगळे झाले.

सुशांतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच तो छिछोरे या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूरही दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/Btk2_s_Hvpg/

 

आरोग्यविषयक वृत्त –