Birthday SPL : चंद्रावर जमीन खरेदी करणारा पहिला अ‍ॅक्टर होता सुशांत सिंह राजपूत ! अंतराळासोबत होता खास लगाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडसाठी आजचा दिवस खास आहे. कारण आज (गुरुवार, दि 21 जानेवारी) बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा वाढदिवस आहे. सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 मध्ये पटण्यात झाला होता. सुशांत जरी आज आपल्यात नसला तरी तो लोकांच्या मनात आजही जिवंत आहे.

सुशांतच्या अनेक गोष्टी आणि छंदांबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. सुशांतला अंतराळासोबत खास लगाव होता. तो चंद्रावर जमीन घेणार पहिला अ‍ॅक्टर होता. आज आपण त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

सुशांतनं चंद्रावर प्लॉट खरेदी केला होता. अनेकांना आता याचं आश्चर्य वाटू शकतं. 2018 मध्ये त्यानं चंद्रावर जमीन खरेदी केली होती. त्याचा हा प्लॉट सी ऑफ मसकोवी मध्ये आहे. सुशांतनं चंद्रावरील ही जमीन इंटरनॅशनल लूनर लँडस रजिस्ट्रीकडून खरेदी केली होती.

त्याला अंतराळासोबत खूप लगाव होता. त्याच्याकडे खास असा अ‍ॅडव्हान्स टेलिस्कोप 14LX00 होता. याच्या मदतीनं तो सॅटर्न रिंग्स सोबतच तारे आणि इतर ग्रह पाहू इच्छित होता.

इंटरनॅशनल संघटनांचं असं म्हणणं आहे की, या जमिनीवर कायदेशीररित्या कोणाचाही हक्क नाहीये. कारण पृथ्वीच्या बाहेरची दुनिया संपूर्ण मानव जातीचा वारसा आहे आणि यावर कोणत्याही देशाचा हक्क नाही असू शकत.

याबाबबत एका मुलाखतीत बोलताना सुशांत म्हणाला होता की, माझी आई सांगायची की, माझं जीवन एक कहाणी असेल जी स्वत: सांगेन. आज मी चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करत आहे आणि आता मी चंद्रावर आहे.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं दि 14 जून 2020 (वार- रविवार) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं होतं. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. या केसमध्ये सीबीआय, ईडी आणि एनसीबी अशा देशातील मोठ्या तपास एजन्सींनी तपास केला परंतु आतापर्यंत कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही.

सुशांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2013 साली आलेल्या काय पो छे या सिनेमातून त्यानं बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर त्यानं शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी : द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, छिछोरे अशा अनेक मोठ्या सिनेमात काम केलं. त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा 24 जुलै 2020 रोजी रिलीज झाला होता. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला होता.