सुशांतच्या मृत्यूचं गूढ ! मृतदेह एका बाजूला झुकलेला होता, मुंबई पोलीस म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने 14 जून रोजी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आवश्यक त्या सर्व गोष्टींचा तपास करत आहे. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले की, सुशांतचा मृतदेह झुकलेल्या अवस्थेत होता. रिपोर्टनुसार, पोलिसांनी जेव्हा पंचनामा केला तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. सुशांतच्या बेडपासून पंख्याची उंची 5 फूट 11 इंच होती आणि मृतदेह एका बाजूला कलंडलेला होता. यानंतर पोलिसांनी पंख्यापासून सुशांतच्या उंचीच माप घेतलं जे 8 फूट 1 इंच होत. यात पोलिसांना कोणताही फाऊल प्ले दिसला नाही.

सुशांतच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, शरीरावर हातापायीचे कोणतेही निशाण मिळाले नाहीत. तसेच शरीराचं कलंडलेपणा स्पष्ट दाखव होतं की मृत्यू गळफास लावूनच झाला होता. दरम्यान, सुशांतने काही विषारी पदार्थ खाल्ला नव्हताना याचा तपास फॉरेन्सिक लॅब करत आहे. त्याचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमूखे यांनी सांगितले की, सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात आतापर्यंत 27 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. वांदे पोलिसांना कुपर इस्पितळाने शेवटचा शवविच्छेदनाचा अहवालही दिला आहे.

यामध्ये सुशांतच्या मृत्यूचे कारण Asphyxia due to hanging असं सांगण्यात आले आहे. पोलिसांनी जे पुरावे गोळा केले ते सर्व फॉरेन्सिक टीम कडे पाठवण्यात आल्याचेही त्रिमूखे यांनी सांगितले. सुशांतने आत्महत्या का केली यासंदर्भात कसून तपास केला जात आहे. मात्र, याच काळात सोशल मीडियातून त्याच्या आत्महत्येविषयी अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.