SSR Death Case : आत्महत्या करण्यापुर्वी सुशांत Google वर सतत सर्च करत होता स्वतःचं नाव, आजार अन्…

मुंबई : बॉलीवुड अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूत केसमध्ये दररोज नवीन माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीसांनी त्याच्या मृत्यूला अगोदरच आत्महत्या जाहीर करून टाकले होते, परंतु बिहार पोलीस हे मानण्यास तयार नाहीत. या दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुशांतबाबत नवीन खुलासे केले आहेत. एका मोठ्या पोलीस अधिकार्‍याने दावा केला आहे की, सुशांत आत्महत्येच्या एक आठवडा अगोदर गुगलवर सतत तीन गोष्टी सर्च करत होता. त्या आहेत – न्यूज रिपोर्टमध्ये आपले नाव, आपली माजी मॅनेजर दिशा सालियानचे नाव आणि आपल्या आजाराबाबत.

फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये खुलासा
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसनुसार एका मोठ्या पोलीस अधिकार्‍याने दावा केला आहे की, 14 जूनच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी त्याने आत्महत्या केली त्या दिवशी सुद्धा सुशांतने गुगलवर आपले नाव सर्च केले होते. अधिकार्‍यांचा दावा आहे की, ही सर्व माहिती त्याचा मोबाईल आणि लॅपटॉपच्या फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर समोर आली आहे. सुशांतच्या मृत्यूच्या एक आठवडा अगोदर त्याची माजी मॅनेजर दिशाने आत्महत्या केली होती. याशिवाय असेही म्हटले जाते की, सुशांतवर डिप्रेशनवरील उपचार सुरू होता.

आतापर्यंत 40 लोकांचे जबाब नोंदले
या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांनी हेदेखील सांगितले की, सुशांतच्या बँक खात्यातून जे काही पैसे काढले आहेत ते सर्व त्याच्या ओळखीच्यांच्या खात्यात गेले आहेत. त्याने मागच्या वर्षी सर्वात जास्त 2.5 कोटींचे ट्रांजक्शन केले होते. हे पैसे त्याच्या खात्यातून जीएसटी म्हणून दिले गेले होते. मुंबई पोलिसांनुसार आतापर्यंत या केसमध्ये 40 लोकांचे जबाब नोंदले गेले आहेत. तसेच पोलिसांनी आतापर्यंत तीन मानसोपचार तज्ज्ञांचा जबाब सुद्धा घेतला आहे.

त्यावेळी काय म्हटले होते कुटुंबियांनी
पोलिसांचे म्हणणे आहे की, आत्महत्येनंतर त्याचे वडील केके सिंह, बहिण नीतू आणि मितू सिंह यांचे जबाब घेण्यात आले होते. या सर्वांनी कुणावरही आरोप केला नव्हता. पोलिसांचा दावा आहे की, या प्रकरणात प्रोफेशनल रायवलरी अंतर्गत सुद्धा तपास करण्यात आला आहे. अनेक प्रॉडक्शन हाऊसच्या स्टाफचे जबाब घेण्यात आले आहेत.

14 जूनला झाला होता मृत्यू
34 वर्षीय सुशांत सिंह राजपूत 14 जूनला आपल्या बांद्रा येथील घरात मृत सापडला होता. त्याच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलीस करत असून कुटुंबियांनी पाटणामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलीस सुद्धा तपास करत आहेत.