#SSR Case : CBI नं दाखल केली FIR,आरोपींमध्ये रियासह भाऊ इंद्रजीत, शौविक चक्रवर्तीच्या नावांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) केंद्र सरकारनं सोपविला. त्यानंतर सीबीआय प्रकरणाच्या तपासाला लागली असून आज सीबीआयनं FIR दाखल केली आहे. FIR मध्ये सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचं देखील नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.

सीबीआयनं भादंवि कलम 306, 341, 342, 420 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्हयात रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुतीमोदी आणि इतरांची नावे आहेत. सुशांत सिंह राजपूतची फसवणूक आणि त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सीबीआयनं त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुरूवातीच्या काळात प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करीत होते. मात्र, त्यांनी अनेक दिवसानंतर देखील गुन्हा दाखल केला नसल्यानं सुशांतच्या वडिलांना पाटणा येथे फिर्याद दिली. त्यानुसार बिहार पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीसह 6 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिस मुंबईत दाखल झाले होते. तपासासाठी आलेल्या पाटण्याच्या पोलिस अधीक्षकास मुंबई महापालिकेनं चक्क क्वारंटाईन केलं. त्यानंतर महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि बिहारमधील नितीश सरकारमध्ये देखील तणाव निर्माण झाला. दरम्यान, बिहार सरकारनं सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी केंद्र सरकारकडे शिफारस केली. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान, केंद्र सरकारकडून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला आहे. आता रिया चक्रतर्वी आणि तिच्या भावाविरूध्द गुन्हा देखील दाखल करण्यात आल्यानं तपासाला आता वेग येणार हे स्पष्ट झालं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like