SSR Death Case : मुंबई पोलिसांमुळे गडबडीत केलं सुशांतच्या ‘बॉडी’चं पोस्टमॉर्टम,डॉक्टरांच्या दाव्यानं प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या निवासस्थानी त्याच्या मृत्यूचा सीन पुन्हा सीबीआयने पडताळून पाहिला. त्यावेळी सुशांतच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम केलेल्या डॉक्टरांची विचारपूस करण्यात आली. पोस्टमॉर्टम एवढया गडबडीत का करण्यात आलं असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यातील एकाने सांगितले की मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरून त्यांनी असं केलं.

रिपोर्टनुसार, सीबीआयने डॉक्टरांना विचारलं की पोस्टमॉर्टमच्या आधी COVID टेस्ट करणे सद्यपरिस्थितीला अनुसरून गरजेचं होतं तरीदेखील तुम्ही ते का केलं नाही. त्यावर डॉक्टरांनी दावा केला कि असा कोणताही नियम नाही. पुढे सीबीआयने विचारलं, रात्री एवढ्या उशिरा पोस्टमॉर्टम करण्याची काय गरज होती त्यावर एका डॉक्टरने सांगितलं की, मुंबई पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. मुंबई पोलिसांच्या या निर्देशांबद्दल आता माहिती समोर आली आहे. सीबीआय याबाबत अधिक चौकशी करत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या घराची दीर्घकाळ चौकशी केल्यानंतर, सीबीआय टीमने अपार्टमेंटच्या बाहेर येऊन 14 जूनला सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेचा सीन पुन्हा तयार केला. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी पहिल्यांदा त्याच्या खोलीत गेलेले व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते.

सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी तिथं कोणतीही पार्टी झाली नव्हती, तिने सांगितलं 13 जुनला रात्री 10:30 वाजता किचन सोडून घरातील सगळ्या लाईट बंद होत्या, ही गोष्ट अपवादात्मक होती. 14 जूनला सुशांत त्याच्या घरात मृत अवस्थेत आढळून आला.