SSR Case : ड्रग्ज अँगलच्या तपासात NCB ला मोठा साक्षीदार सापडला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दररोज नवनवीन वळण येताना पहायला मिळत आहे. सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल आल्यानंतर या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. नार्कोटिक्स विभागाला (NCB) आता मोठा साक्षीदार सापडला आहे. लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरून रिया चक्रवर्तीच्या घरी ड्ग्जचं कुरिअर पोहोचवणाऱ्या कुरिअर बॉयने या प्रकरणात अटकेत असलेल्या दिपेश सावंत आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला त्याने ओळखले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिलमध्ये सुशांतच्या घरून रियाच्या घरी एक कुरिअर पाठवण्यात आले होते. दिपेश सावंतने हे कुरिअर दिलं होतं, ज्यामध्ये अर्धा किलो बड्स होते. लॉकडाऊन दरम्यान बड्सचे पॅकिंग चेकिंगदरम्यान पकडले जाऊ नये, यासाठी या पॅकिंमध्ये घरातील सामानही ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्याने कुरिअरमार्फेत बड्स मागवण्यात आले होते.

सुशांतच्या घरातून बड्सचे पॅकिंग असलेले कुरिअर पोहचवण्याऱ्या कुरिअर बॉय दिपेश आणि शोविकला ओळखलं आहे. याशिवाय या कुरिअर बॉयचे फोन डिटेल्सही शोविक आणि दिपेशकडे सापडले आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता.

रियाचा भाऊ शोविक याने आपण सुशांतसाठी ड्रग्ज घेत होतो असं सांगितले होते. तसेच आपण आतापर्यंत कधीच अंमली पदार्थाचे सेवन केले नसल्याचे रिया सांगत आली होती. अखेर तिने आपण ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली. परंतु अटकेनंतर तिनं आरोप मान्य करायला आपल्यावर दबाव टाकल्याचे सांगितले. मात्र, आता सुशांतच्या घरुन रियाच्या घरी ड्रग्जची डिलीव्हरी झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.