सुशांत सिंहला करण्यात आलं होतं कोट्यवधीचं पेमेंट ! ED च्या तपासात मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमधील ई़डी (ED) च्या तपासाला पुन्हा एकदा गती आली आहे. या प्रकरणी सुशांतला केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या पेमेंटचा ईडीला सुगावा लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतला त्याच्या एका सिनेमासाठी हे संशयित पेमेंट करण्यात आलं आहे. ही रक्कम 17 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

सूत्रांनी सांगितलं आहे की, या पेमेंटबद्दलचा तपास सुरू आहे. सुशांत सिनेमा राबता (Raabta) साठी हे 17 कोटींचं पेमेंट 2017 साली करण्यात आलं होतं. सिनेमाचे प्रोड्युसर दिनेश विजान (Dinesh Vijan) यांच्यासाेबत गेल्या महिन्यात याबाबत ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. दिनेशला या पेमेंट संबंधित काही कागदपत्रे जमा करण्यास सांगितलं गेलं होतं. परंतु हंगरीमध्ये शूट झालेल्या सिनेमाचे ओव्हरसीज शूट बजेटचे डिटेल दिनेश जमा करू शकले नव्हते.

ओव्हरसीज शूटिंगसाठी निर्मात्यांना काही रक्कम पेमेंट स्वरूपात दिली जाते. ही रक्कम संबंधित देशात शूटिंगसाठी खर्च केलेल्या एकूण बजेटच्या जवळपास 20 टक्के असू शकते. याला ओव्हरसीज पेमेंट पर्क्स म्हटलं जातं. एजन्सीला असा संशय आहे की, प्रोड्युसर्स परदेशी सरकारांना खास करून युरोपीयन देशातील सरकारांना जास्त खर्चाचा तपशील दाखवतात. जेणेकरून जास्तीत जास्त पेमेंटचा लाभ घेता येईल आणि या पैशांचा वापर अभिनेता किंवा अभिनेत्रींचं पेमेंट देण्यासाठी वापरता येईल. एजन्सीला असा संशय आहे की, या पैशाला संबंधित देशाच्या हवाला चॅनेल्सच्या माध्यमातून पाठवलं जातं.

दिनेश विजान यांनी कागदपत्रं जमा न केल्यानं त्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत ईडीला प्रोड्युसरच्या घरातून बजेट संबंधित कागदपत्रे मिळाली होती जे त्यांनी बुडापेस्टमध्ये ऑथोरिटीजकडे जमा केले होते.

आता 17 कोटी रुपयांच्या मिसिंग पेमेंटबद्दल प्रोड्युसर दिनेश विजान सवालांच्या घेऱ्यात आहे. या प्रश्नांची उत्तरं देण्यास दिनेश असमर्थ दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दिनेश आता दुबईत आहेत. एजन्सीनं त्यांना समन्स बजावलं तेव्हा त्यांनी कोविड 19 चं कारण सांगितलं होतं आणि मेडिकल सर्टिफिकटेही दाखवलं होतं.

दिनेश विजान यांच्याव्यतिरिक्त ईडीनं गेल्या काही दिवसांपूर्वी सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी (Shruti Modi) आणि सुशांतचं अकाउंट सांभाळणाऱ्या उदय सिंह गौरी (Uday Singh Gauri) यांचीही चौकशी केली होती. मनी लाँड्रिंगबद्दल ईडीनं आजवर केलेल्या तपासात कुठेही अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) विरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही.

You might also like