‘सुशांतच्या प्रकरणामध्ये काही संशय – तक्रार नाही’, वडिल के.के. सिंह यांनी मुंबई पोलिसांना सांगितलं होतं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  सुशांत सिंह राजपूत केसमध्ये केके सिंह यांचे वक्तव्य समोर आले आहे, जे त्यांनी मुंबई पोलिसांना दिले होते. सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांच्यानुसार, 14 जूनच्या अगोदरपासून सुशांत सिंहची तब्येत ठिक नव्हती. 7 जूनला त्यांची आणि सुशांतची चर्चा झाली होती. केके सिंह यांनी जबाबात सुद्धा सांगितले होते की, सुशांतने आत्महत्या केलेली असू शकते.

मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, केके सिंह यांनी म्हटले की, माझा मुलगा सुशांत मुंडन सोहळ्यासाठी 13 मे 2019 ला पाटणामध्ये आला होता. माझी त्याच्याशी भेट झाली होती. 15 मेराजी सुशांतचा मुंडन सोहळा झाला होता. तेव्हा तो तणावात नव्हता. तो 16 मे 2019 ला परत मुंबईत आला. मी त्याला व्हॉट्सअप मॅसेज करत होतो. सुशांत माझ्या मॅसेजचे उत्तरसुद्धा देत होता. मी त्याला जास्त कॉल करत नव्हतो, कारण तो कामात बिझी असायचा. सुशांतच मला कॉल करायचा आणि आम्ही चॅट करत होतो. तो मला कॉल करून विचारायचा की काही आवश्यकता आहे का. तो नेहमी माझी विचारपूस करायचा आणि मी त्याला उत्तर देत असे.

यानंतर सुशांतने मला यावर्षात 7 जूनला कॉल केला आणि मी त्याला म्हणालो की तु पाटणाला आलेला आता एकवर्ष होऊन गेले. जर तुझी इच्छा असेल तर पाटणाला ये. यावर त्याने म्हटले होते की, पाहतो. माझी तब्येत ठिक नाही. ठिक झालो की येतो. केके सिंह यांनी म्हटले की, मी पाटणाला घरी होतो आणि 14 जूनला दुपारी 2.30 वाजता मला टीव्हीवर समजले की, सुशांतने आत्महत्या केली आहे. यानंतर मला शुद्ध राहिली नाही आणि मला चक्कर येऊ लागली. मी पुतण्या नीरज सिंह आणि काही नातेवाईकांसोबत मुंबईला पोहचलो.

केके सिंह यांनी आपल्या जबाबात म्हटले की, आम्ही आमचा मुलगा सुशांतचे अंत्यसंस्कार विले पार्ले (पश्चिम) मध्ये दिनांक 15 जूनला सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान केले. त्यानंतर, मी सुशांतच्या फ्लॅटवर आलो, जो त्याने बांद्रामध्ये भाड्याने घेतला होता. मी कुणाला काहीही बोललो नाही आणि मी काही कुणाला विचारलेही नाही. मला हे माहित नाही की, सुशांतने आत्महत्या का केली. त्याने कधीही माझ्याशी कोणत्याही तणावाबाबत चर्चा केली नव्हती. मला सुशांतच्या विरोधात कोणताही संशय नाही. मला वाटते सुशांतने आत्महत्या केली असावी.