सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा CBI तपास करणार, केंद्र सरकारनं SC मध्ये सांगितलं, कोर्ट म्हणाले – ‘सत्य समोर आलं पाहिजे’

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बिहार सरकारनं केलेली सीबीआय चौकशीची मागणी केंद्र सरकारनं स्विकारली असल्याचं सांगितलं आहे. पटणा येथे दाखल असलेला गुन्हा मुंबई वर्ग करण्याबाबत दाखल असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी चालु आहे. न्यायमुर्ती ऋषिकेश रॉय यांचे खंडपीठ सुनावणी करत आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये 14 जून रोजी आढळून आला होता. मुंबईसह बिहार पोलिस प्रकणाच्या तपासात मग्न आहेत. सुशांतचे वडिल कृष्ण किशोर सिंह यांनी 25 जुलै रोजी रिया चक्रवर्तीसह इतर 6 जणांविरूध्द आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. रियानं केस पटणा येथून मुंबई येथे वर्ग करण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुशांतच्या वडिलांनी कोर्टात कॅव्हेट दाखल केलं होतं. त्यानंतर बिहार आणि महाराष्ट्र सरकारनं कोर्टामध्ये याचिकेवर म्हणणं आमचं म्हणण ऐकून घेण्याची विनंती केली होती. दरम्यान, केंद्र सरकारनं बिहार सरकारनं केलेली सीबीआय तपासाची शिफारस आपण मान्य केल्याचं सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे.