बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नाही, रिया आणि सुशांतच्या कुटुंबाचं पटत नव्हत, मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये वाद सुरु आहे. या सर्वा दरम्यान सोमवारी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माध्यमांशी चर्चा केली. या संपूर्ण वादावर ते म्हणाले की, बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार नाही, आम्ही त्यावर कायदेशीर सल्ला घेत आहोत. आम्ही अद्याप कोणालाही क्लीन चिट दिली नाही. बिहार पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाईनमध्ये पाठवताना मुंबई पोलिस आयुक्तांनी सांगितले की, कोणासही क्वारंटाईन करण्याचा आमचा अधिकार नाही, ही सर्व बीएमसीची बाब आहे.

‘रिया आणि कुटुंबाचे चांगले संबंध नव्हते’
पत्रकार परिषदेदरम्यान पोलिस आयुक्तांनी सांगितले की, सुशांतच्या कुटुंबीयांनी 16 जून रोजी आपल्या निवेदनात म्हटले की, त्यांना या प्रकरणात कोणावरही संशय नाही. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, रिया चक्रवर्तीने 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले होते, कारण तीही डिप्रेस होती. तिची प्रकृतीही ठीक नव्हती, म्हणून ती निघून गेली. यानंतर सुशांतची बहीण आली, तीसुद्धा 13 जूनला निघून गेली कारण तिच्या मुलीची परीक्षा होती. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार रियाची दोन विधाने नोंदविण्यात आली असून त्यात त्यांच्या नात्यात काहीतरी गडबड असल्याचे उघड झाले आहे. तिने सुशांतच्या मनाची स्थिती आणि काही घटनांबद्दल सांगितले. आम्ही सर्वकाही क्रॉस चेक केले आहेत. रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या कुटूंबियात थोडा वाद झाला होता.

‘खर्चामुळे सुशांत चिंतीत’
आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, आम्ही सुशांतची बहीण प्रियंका यांना पुन्हा निवेदन नोंदवण्यासाठी बोलवले होते, पण ती वक्तव्य देण्याच्या स्थितीत नव्हती. परंतु कुटूंबाने कोणाविरूद्ध कोणतीही शंका उपस्थित केली नाही. आम्हाला सुशांतची डायरी मिळाली आहे ज्यात तो आपला खर्च ठेवत असे. सुशांतच्या वतीने सीएला सांगण्यात आले की, महिन्याचा खर्च कमी करावा. सुशांतच्या गुगल इतिहासामध्ये, बायपोलर, त्याचे स्वतःचे नाव आणि वेदना न होता मृत्यू सारखे शब्द शोधले गेले.

मुंबई पोलिस आयुक्तांनी निवेदनात म्हटले की, जानेवारी 2019 ते जून 2020 या कालावधीत बँक स्टेटमेंटची चौकशी करण्यात आली आहे, जे जवळपास 14 कोटी रुपये होते. सुशांतच्या वतीने त्यांच्या वकिलांना निरोप देण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी दिशाच्या आत्महत्येत त्याच्या नावावर प्रश्न उपस्थित केला. पोलिस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 56 निवेदने नोंदविण्यात आली आहेत, फॉरेन्सिक तज्ञाकडे काम सुरू आहे.

या संदर्भात आम्ही मानसशास्त्रज्ञांशी बोललो आहे, फॉरेन्सिक संघ सुशांतच्या फ्लॅटवर गेले आहेत. संपूर्ण फ्लॅट सील करण्यात आला आहे, सुशांतने एकदा दिशाला भेट दिली. परंतु मृत्यूच्या वेळी त्याचे नाव समोर आल्यावर तो खूप नाराज झाला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अलीकडेच सुशांतचे कुटूंबीय आणि जवळच्या व्यक्तींनी असा आरोप होता की रिया चक्रवर्तीशी संपर्क साधल्यानंतर सुशांतची तब्येत ढासळली होती, त्याच्या खात्यातून कोट्यावधी रुपये गहाळ झाले होते. सुशांतच्या कुटुंबीयांनीही बिहारमध्ये गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर बिहार पोलिसांची टीम मुंबईतील लोकांचा जबाब नोंदवित आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like