सुशांत सिंह राजपूत केस : मुंबई-गोव्याच्या राजकारणात भूकंप आणतील ’रिया’ आणि ’गप्पी’!

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत केसचा तपास करत असलेल्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ला ’रिया’ आणि ’गप्पी’कडून महत्वाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इतर अनेक लोकांची चौकशी सुरू केली आहे. प्रकरणाशी संबंधीत अनेक धागेदोरे आता जुळत असल्याचे दिसत आहे. शक्यता आहे की लवकरच तपास एजन्सी असा खुलासा करू शकते, ज्यामुळे मुंबई आणि गोव्याच्या राजकारणात भूकंप येऊ शकतो.

या केसमध्ये आतापर्यंत डझनभर ’गप्पी’ ड्रग पॅडलरची चौकशी करण्यात आली आहे. हे सुद्धा समजले आहे की, मुंबईच्या हाय प्रोफाईल भागांमध्ये जेव्हा ड्रगची ऑनलाइन बुकिंग होत होती, तेव्हा ती पाचव्या थांब्यानंतर ठरलेल्या अ‍ॅड्रेसवर पोहचत होती. यातील दोन थांबे सिंडिकेटचे सदस्य आणि बाकीचे तीन थांबे लोकल ’गप्पी’च्या ठिकाणांवर असायचे.

ड्रग सिंडिकेटमध्ये जी नावे येत आहेत, त्यातून या केसमध्ये तपास एजन्सीची कक्षा मुंबई आणि गोव्याच्या बाहेरपर्यंत जाऊ शकते. ’गप्पी’ फयाज अहमदला एनसीबीने गोव्यातून अटक केली होती. या गप्पीकडून माहिती मिळाली आहे, ती खुप महत्वाची आहे. यामध्ये ड्रग सिंडिकेटच्या मोठ्या सदस्यांना फयाजच्या समोर बसवून चौकशी केली जाईल. आतापर्यंत मिळालेल्या माहितीमध्ये मुंबईतील अनेक मोठी नावे समोर आली आहेत.

रिया आणि शोविकशिवाय एनसीबीने आतापर्यंत डझनभरपेक्षा जास्त गप्पींना चौकशीसाठी बोलावले आहे. यामध्ये पाहिल्या आणि दुसर्‍या थांब्याचे ड्रग सिंडिकेटचे दुसरे सदस्य सहभागी आहेत. ऑर्डर बुक झाल्यानंतर डिमांड नोट सर्वप्रथम कुणाकडे तरी पोहचत होती, त्यानंतर ओकेचा मेसेज आल्यानंतर मागवणार्‍या व्यक्तीला पेमेंटचा पर्याय दिला जात होता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोकल गप्पीला सूचना दिली जात होती. ते ड्रग कन्साईनमेंट संबंधित अ‍ॅड्रेसवर पोहचवत होते. एनसीबीने तयार केलेली संशयितांची यादी आता मोठी होत चालली आहे.

ड्रग सिंडिकेटच्या मोठ्या नावांशिवाय मुंबई आणि गोव्यातील लोकल गप्पीसुद्धा एनसीबीच्या रडारवर आहेत. मुंबईमध्ये अशा अनेक राजकीय नेत्यांची नावे सुद्धा या सिंडिकेटशी जोडली गेल्याचे बोलले जात आहे, ज्यांची नावे प्रसिद्ध होताच सत्तेच्या राजकारणात खळबळ उडू शकते. तपासादरम्यान, हे सुद्धा समजले आहे की, मुंबई ड्रग सिंडिकेटचे अनेक गट आहेत. प्रत्येक गटाची सूत्र वेगवेगळ्या लोकांच्या हातात आहेत. मुंबईतील सहा प्रमुख ड्रग पॅडलर्स आणि गोव्याचे चार ड्रग माफियांची नावे समोर आली आहेत.