…म्हणून रिया चक्रवर्तीला ‘वारंट’ शिवाय देखील होवु शकते अटक !

पाटणा : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पाटण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत आहे. या पथकाने आतापर्यंत बर्‍याच लोकांची चौकशी केली आहे. बिहार पोलिस अद्याप रिया चक्रवर्तीपर्यंत पोचले नाहीत. पण सूत्रांच्या माहितीनुसार टीम सतत रिया चक्रवर्तीवर लक्ष ठेवून आहे. रियाची लपण्याची जागाही सापडली आहे. परंतु टीम योग्य वेळेची वाट पाहत आहे, जेणेकरून तिच्याकडून प्रश्नांची उत्तरे मिळतील.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत झालेल्या घडामोडींवरून हे स्पष्ट झाले आहे की, रिया आणि तिचा भाऊ पटना पोलिसांसमोर येऊ इच्छित नाही. रियाला माहित आहे की पाटणा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, त्यात वॉरंटशिवाय अटक करणे शक्य आहे. या कलमांतर्गत वॉरंटशिवाय अटक करण्याचा पोलिसांना अधिकार असल्याचे वरिष्ठ गुन्हेगारी वकील अरविंद कुमार मौआर यांनी सांगितले.

हे आहेत आरोप
पाटणा येथे नोंदवलेल्या प्रकरणात रियावर आरोप आहेत की, सुशांतकडून पैसे घेऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. रियावर आयपीसीच्या कलम ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२०, ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लूकआऊट नोटीसची तयारी
सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती ही त्याचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह भूमिगत झाली आहे. सूत्रांनुसार, दोघांचा मोबाईल बंद आहे. अशा परिस्थितीत दोघेही देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पाटणा पोलिसांच्या एसआयटीने त्यांच्याविरूद्ध लूकआउट नोटीस काढण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित विभागाला पत्रही लिहू शकतात.

मुंबई पोलिसांनी पुढील सहयोगाचे दिले आश्वासन
बिहारचे पोलिस महानिरीक्षक गुप्तेश्वर पांडेय म्हणाले की, मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सुरुवातीला आवश्यक सहकार्य केले नाही. पण पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक तेथे बोलले आणि मुंबई पोलिसांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, मुंबई पोलिसांनी आमच्या पथकाला सर्व कागदपत्रे, घटनास्थळाचे फुटेज, पोस्टमॉर्टम इत्यादी सुविधा पुरवाव्यात अशी आमची इच्छा आहे. टीमला ऑटोने प्रवास करावा लागत आहे, म्हणून त्यांना वाहन उपलब्ध करून द्या. त्यांना संरक्षण द्या.

राज्य सरकारने ट्विट करून केले आवाहन
सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे आपल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे, ज्याची चौकशी करणे बिहार पोलिसांचे वैधानिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सर्व पक्षांनी तपासात सहकार्य केले पाहिजे.