लहान मासा गळाला लागलाय…रियाच्या भावाला अटक होताच शेखर सुमन यांचे ट्विट

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. या कारवाईवर अभिनेता शेखर सुमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता छोटा मासा गळाला लागला आहे, मोठा शार्क लवकरच जाळ्यात अडकला जाईल, असे ट्विट त्यांनी केले आहे.

यशाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. आता लहान मासा गळाला लागला आहे. पण लवकरच मोठा शार्कदेखील पकडला जाईल. मला खात्री आहे त्या मोठ्या शार्कलादेखील लवकरच पकडण्यात येईल. इंडस्ट्री स्वच्छ करण्यात येत आहे, असे ट्विट शेखर सुमन यांनी केली आहे. दरम्यान, सुशांतला न्याय मिळावा यासाठी शेखर सुमन हे सातत्याने पाठिंबा देत आहे. यापूर्वीदेखील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कलाविश्वातील घराणेशाही, गटबाजी यासारख्या मुद्द्यावर मत मांडले आहे. त्यानंतर आता शोविकला अटक झाल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्याप्रमाणेच कलाविश्वातील अनेकांनी याप्रकरणी समाधान व्यक्त केल्याचे दिसून आले आहे .लवकरच याबाबत आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.