सुशांत आणि यश राज फिल्म्समध्ये झाली होती 3 सिनेमांची ‘डील’ ! समोर आली संशयास्पद माहिती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर आता त्याच्या आत्महत्ये प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्याच्या आत्महत्येची केस ब्रांद्रा पोलीस ठाण्यात नोदंवली गेली असून या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलीस करत आहे. अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की, सुशांत आणि यश राज फिल्म्स यांच्यात 3 सिनेमांचं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. याच्या काही कॉपीज देखील पोलिासांना मिळाल्या होत्या. या संदर्भात आता नवीन अपडेट्स समोर आले आहेत.

सुशांतसोबत झाली होती यश राजची डील, होत्या ‘या’ अटी

यश राज आणि सुशांत यांच्या झालेल्या कॉन्ट्रॅक्टचे डिटेल्स समोर आले आहेत. यानुसार दोघांमध्ये 3 सिनेमांसाठी डिल झाली होती. पहिल्या सिनेमासाठी त्याला 30 लाख रुपये देण्यात आले होते. कॉन्ट्रॅक्टमध्ये असा उल्लेख आहे की, जर पहिला सिनेमा हिट झाला तर दुसऱ्या सिनेमासाठी त्याला 60 लाख दिले जातील. जर हा सिनेमाही हिट झाला तर तिसऱ्या सिनेमासाठी त्याला 1 कोटी दिले जातील.

सुशांतं यश राज सोबत जो पहिला सिनेमा केला तो होता शुद्ध देसी रोमांस. यासाठी त्याला 30 लाख रुपये देण्यात आले होते.

यश राज सोबत जो दुसरा सिनेमा सुशांतनं केला तो होता ब्योमकेश बक्शी. यासाठी त्याला 1 कोटी रुपये देण्यात आले होते. वास्तविक पाहता हे स्पष्ट नाही केलेलं की, कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहलेलं असूनही त्याला 60 लाखांऐवजी 1 कोटी रुपये का देण्यात आले.

सुशांतनं यश राज फिल्म्सचा पानी हा तिसरा सिनेमा साईन केला होता. हा सिनेमा डायरेक्टर शेखर कपूर बनवणार होते. यश राजच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे की, हा सिनेमा यामुळं नाही तयार झाला कारण आदित्य चोपडा आणि शेखर कपूर यांच्या क्रिएटीव्ह डिफरंस होते.