’48 तासात जाहीर माफी मागा, अन्यथा…,’ सुशांतच्या नातेवाईकाची संजय राऊत यांना नोटीस

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करताना अनेक दावे केले होते. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केले असून ते सुशांतला मान्य नव्हते असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सुशांतच्या चुलत भावाने संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे.

सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार याने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नीरजने संजय राऊत यांना 48 तासात जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा असे म्हटले आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येबाबत अजूनही राजकारण पेटले असल्याचे स्पष्ट झाले आहे. राउत यांनी माफी मागण्याचे सुशांतच्या कुटूंबियाने म्हटले आहे. संजय राऊत यांनी दावा होता आहे की, सुशांत हा वडिलांच्या दुसर्‍या लग्नामुळे खूश नव्हता. त्यामुळे तो किती वेळा वडिलांची भेट घेण्यासाठी पाटण्याला गेला होता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर येऊ नये म्हणून यावर राजकारण करण्यात आले. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण काढून घेण्यात आले. असा आरोपही त्यांनी केला होता. सुशांतच्या कुटुबीयांकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like