सुशांत सिंह राजपूतचं शरीर ‘पिवळं’ पडलं अन् दोन्ही पाय झाले होते ‘वाकडे’, अ‍ॅम्बुलन्स अटेंडेंटचा खळबळजनक दावा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूतच्या कथित आत्महत्येप्रकरणी आता वेगाने चौकशी सुरू आहे. एकीकडे अंमलबजावणी संचालनालय पैशांच्या व्यवहारावर चौकशी करत आहे. तर दुसरीकडे सीबीआयनेही निवेदने नोंदवण्यास सुरवात केली आहे. दररोज या प्रकरणाशी संबंधित बर्‍याच नवीन गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान सुशांतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्स अटेंडेंटने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

ऍम्ब्युलन्स अटेंडंटने सांगितले की, जेव्हा तो सुशांत सिंह राजपूतच्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याचा मृतदेह पलंगावर पडलेला होता. अटेंडंटच्या मते, सुशांतचे शरीर पिवळे पडले होते. यापूर्वीही त्याने आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे मृतदेह पाहिले आहेत पण ते पिवळे पडले नव्हते.

त्यासोबतच अटेंडंटने सांगितले की, सुशांतच्या पायावर डाग होते आणि ते वाकले होते. सुशांतच्या तोंडाला फेस येतानासुद्धा त्याने पाहिले नाही. इतकेच नाही तर अटेंडंटने सुशांतच्या गळ्यावर असलेल्या खुणेबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच त्याच्यावर पोलिसांचा दबाव असल्याने या प्रकरणात तो अधिक गोष्टी सांगू शकत नसल्याचेही त्याने म्हटले.

रिया चक्रवर्तीची १० तास चौकशी
रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आरोप आहेत. रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची ईडीने सोमवारी सुमारे १० तास चौकशी केली. यावेळी रियाच्या उत्पन्नासह इतरही गोष्टी उघडकीस आल्या, पण ती ईडीच्या काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकली नाही.

रिया चक्रवर्तीने ईडीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, रियाने चौकशीत सांगितले की ती सुशांत सिंह राजपूतचे फायनान्स नियंत्रित करत होती. रिया चक्रवर्ती तिच्या बँक खात्यातील जमा रक्कम आणि आयटीआरमधील फरक समजावू शकली नाही. एवढेच नव्हे तर तिने गृहकर्जामधून सूट देण्याबाबतही ईडीला काही सांगितले नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like