अंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती स्वप्नांची यादी, राहिली अर्धवट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बॉलीवुड अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूत (Bollywood actor Sushant Singh Rajput) ने 14 जून 2020 ला जगाचा निरोप घेतला होता. सुशांतच्या जाण्याची बातमी सर्वांसाठी धक्कादायक होती. बॉलीवुडपासून टीव्ही इंडस्ट्री (TV Industry) आणि फॅन्सपर्यंत सुशांतच्या जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला होता. कुणाचाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की, हसत-खेळत जगणारा सुशांत सिंह राजपूत आता या जगात नाही.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

File photo

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) एक महत्वकांक्षी कलाकार होता. त्याला चांगले चित्रपट (Movies) करण्याची आवड होती आणि मोठ-मोठी स्वप्न तो बघत होता. सुशांत नेहमी आपल्या स्वप्नांची यादी बनवत असे आणि ती आपल्या फॅन्सबरोबर शेयर करत असे. सुशांत सिंह राजपूत फॅन्सला नेहमी सांगत असे की, कोणतेही स्वप्न छोटे नसते आणि ते पाहण्यासाठी कोणतेही वय नसते.

File photo

सुशांत सिंह राजपूतने आपल्या 50 स्वप्नांची यादी बनवली होती. ही लिस्ट त्याने सोशल मीडिया (Social Media) वर शेयर केली होती. सुशांत सिंह राजपूत अंतराळासाठी वेडा होता. त्याला अंतराळाबाबत जाणून घेणे, नासामध्ये काम करण्याची इच्छा होती. सोबतच तो स्पोर्टचा सुद्धा फॅन होता. तसेच जग चांगले बनवण्याची त्याची इच्छा होती.

File photo

 

सुशात सिंह राजपूतने आपल्या स्वप्नांच्या यादीत म्हटले होते की, त्याला प्लेन उडवण्यापासून दृष्टीहीन लोकांना कंप्यूटर कोडिंग शिकवायचे होते.
सुशांतला गाड्यांची सुद्धा आवड होती.

सुशांत सिंह राजपूत

त्याला Lamborghini गाडी खरेदी करायची होती. सुशांत एक चांगला अ‍ॅक्टरसह संवेदनशील माणूस सुद्धा होता.
त्याला पर्यावरणासाठी सुद्धा योगदान द्यायचे होते आणि 1000 झाडे लावण्याची तयारी करत होता.

File photo

स्वामी विवेकानंद यांच्यावर डॉक्युमेंट्री, सीमेटिक्सवर प्रयोग, ट्रेनने युरोपचा दौरा, महिलांना आत्मसुरक्षेचे प्रशिक्षण देणे आणि क्रिया योग शिकणे सारखे उपक्रम त्याच्या स्वप्नांच्या यादीत होते. सोबत प्रोफेशनल खेळाडूसोबत चेस आणि पोकर खेळणे, मोर्स कोड शिकणे तसेच त्याला शेती सुद्धा करायची होती.

File photo

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : sushant singh rajput death anniversary 50 dreams list from workshop at nasa to flying a plane and more in marathi

हे देखील वाचा

Milkha Singhs wife | भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोविडमुळे निधन

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता, 13 आमदार पक्ष सोडणार? केंद्रीय नेतृत्वाची डोकेदुखी वाढली

Sucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार ‘कोसळला’, अदानी समूहासाठी ठरला ‘काळा’ दिवस