sushant singh rajput death anniversary | सुशांत सिंह आत्महत्या की हत्या? एक वर्षानंतरही गुढ कायम; सीबीआयला छडा लावण्यात अपयश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Famous actor Sushant Singh Rajput) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Committed suicide) केली. या घटनेला आज बरोबर एक वर्ष होत (sushant singh rajput death anniversary) आहे. या सुशांतसिंहच्या मृत्युनंतर महाराष्ट्र विरुद्ध बिहार (Maharashtra vs Bihar) असे चित्र रंगविण्यात आले. मुंबई पोलिसांविरुद्ध (Mumbai Police) बदनामीचे षड्यंत्र सुरु झाले. त्यात केंद्रीय तपास संस्था सीबीआय आणि एनसीबी (Central Bureau of Investigation (CBI) and NCB) या उतरल्या. मात्र आज वर्ष झाल्यानंतरही सीबीआयला अजूनही सुशांतसिंह ने आत्महत्या केली की त्याची हत्या (Murder) याविषयीचा निष्कर्ष (Conclusion) देता आला नाही.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Sushant Singh Rajput Instagram
सुशांतने आत्महत्या केली ?

गेल्या वर्षी 14 जून रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा Sushant Singh Rajput मृतदेह वांद्रे (Bandra) येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्युनंतर दोन दिवसांनी त्याचे वडिल (father), बहीण (sister) यांचे जबाब नोंदविले होते. सुशांत याने आत्महत्या (Suicide) केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासातून पुढे आला होता.

Image: Instagram/rhea_chakraborty

राज्य सरकार व पोलिसांवर टीकेची झोड

त्याचवेळी, बिहारच्या निवडणुका (Bihar elections) आल्याने भाजपने (BJP) हा मुद्दा उचलून धरला. सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाल्याचा आरोप (Alleged murder) करुन महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) व मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) टिकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यात बिहार पोलीस (Bihar Police) आणि राज्य सरकार (State Government) सहभागी झाले. सुशांतसिंह  यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन (FIR) पाटण्यात (Patna) सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा (FIR Against actress Riya Chakraborty) दाखल करुन त्याचा तपास तातडीने सीबीआयकडे (CBI) सोपविला.

But some of his dreams are now left unfulfilled. (Image: Twitter @itsSSR)

सायबर पोलिसांकडून गुन्हा

सुशांतच्या मृत्यूवरून सोशल मीडियावर (Social media) मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्यंत्र सुरु झाले. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात सायबर पोलिसांना (Cyber police) 80 हजारांहून अधिक बनावट खाती (Fake accounts) सापडली. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा (FIR) नोंदवत तपास सुरु केला. सुशांतसिंह याने आत्महत्या केल्याचा मुंबई पोलिसांनी काढलेल्या निष्कर्षाच्या पुढे जाऊन सीबीआयला काहीही हाती न लागल्याने काही महिन्यांतच सीबीआयने चुप्पी साधली ती आजपर्यंत कायम आहे.

The reel Dhoni, Sushant, had a dream to play cricket match left-handed, bat and ball both. (Image: Twitter @itsSSR)

सुशांत करत होता अंमली पदार्थाचे सेवन

दुसरीकडे सुशांतसिंह हा अंमली पदार्थाचे (drugs) सेवन करत असल्याचे उघड झाल्याने नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) (Bureau of Narcotics Control NCB) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) या तपासात उडी घेतली. रिया चक्रवर्तीपासून (Riya Chakraborty) अनेक जणांना एनसीबीने अटक (Arrest) केली. मुंबईतील विविध अभिनेते, अभिनेत्री (Actors, actresses) ड्रग्ज (Drugs) घेत असल्याचे उघड झाले. त्यातील काही जणांना एनसीबीने अटकही केली. मुंबईतील ड्रग्ज पेडलरांची (Drug peddlers in Mumbai) धरपकड झाली. पण, सुशांतसिंहच्या मृत्युबाबत काहीही निष्कर्ष केंद्रीय तपास यंत्रणा काढू शकल्या नाहीत.

Image: Instagram/@sushantsinghrajput

CBI अधिकाऱ्यांची चुप्पी

या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयच्या दिल्लीतील मुख्यालयातील पथक (Headquartered in Delhi) अनेक महिने मुंबईत ठाण मांडून बसले होते.
आपण काय तपास करतो, याची मिनिटामिनिटांची खबरबात ते टीव्ही चॅनेलला (TV channel) देत होते.
मात्र, ज्या हेतूने हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
तो सिद्ध होऊ शकत नाही असे दिसले.
तोपर्यंत बिहारच्या निवडणुकाही (Bihar election) होऊन गेल्या होत्या.
त्यामुळे सीबीआयच्या अधिकार्‍यांनी चुप्पी साधली ती आजपर्यंत कायम आहे. सुशांतसिंह याची हत्या की आत्महत्या यावर वर्षानंतरही सीबीआय आपला निष्कर्ष जाहीर करु शकली नाही. आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सीबीआयचा वापर केला गेल्याचे दिसून येत आहे.

File image: Rhea Chakraborty (left)

And helping more women train in self-defence. (Image: Twitter @itsSSR)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  sushant singh rajput death anniversary | Sushant Singh’s do suicide or murder? The mystery persists even after a year; Failure to prosecute the CBI

हे देखील वाचा

अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…

Burglary in Pune | आंबेगावमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; बंद फ्लॅटमधून 3 लाखांचा ऐवज लंपास

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक