भूमी पेडणेकरचा शिक्षक होता सुशांत सिंह राजपूत, ‘हा’ विषय शिकण्यासाठी हातात पेन-पेपर घेऊन पहायची त्याची वाट !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. काही सेलेब्स आणि फ्रेंड्स अनेक पोस्ट शेअर करत आहेत. सुशांतला जाऊन एक आठवडा होत आला आहे. तरी आजही सेलेब्स पोस्ट शेअर करत त्याची आठवण काढत आहेत. बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकर हिनं नुकताच सुशांतचा सोबतचा फोटो शेअर केला होता. यानंतर आता मात्र तिनं एक कविता आणि इमोशनल नोट शेअर केली आहे आणि सुशांतची आठवण काढली आहे.

भूमीनं तिच्या इंस्टावरून नोटबुकचा फोटो शेअर केला आहे ज्यात अंतराळाबद्दल काही गोष्टी लिहल्या आहेत. भूमीनं हेही सांगितलं आहे की, सुशांत तिचा टीचर बनला होता. भूमी पेन आणि पेपर घेऊन त्याची वाट पहायची. भूमीनं त्याच्यासाठी खास कविताही लिहली आहे. यातून तिनं हे सांगितलंय की, सुशांतला पुस्तकं, अंतराळ आणि म्युझिकची किती आवड होती. सोबतच त्याची ही आवड तो दुसऱ्यांसोबत कशी शेअर करायचा.

भूमीनं सांगते की, सुशांतकडे टेलीस्कोप होता. भूमीनं सांगितलं की, तो कशा प्रकारे आनंदानं उड्या मारत भूमी आणि बाकी लोकाना टेलीस्कोपमधून वेगवेगळे ग्रह आणि ब्लॅक होल दाखवत असे. जे पाहून ते सर्व चकित होत असे. सोबतच भूमीनं आणखी खूप काही सांगितलं आहे. भूमीनं त्याच्याकडून काय काय शिकलं. दोघांनी कशा प्रकारे मस्ती केली याबद्दलही तिनं लिहलं आहे. भूमी म्हणते, तू खूप आठवशील. आमचा SSR.”