SSR Case : सुशांतचे कुटुंब करणार संजय राऊतांवर मानहानीचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत आत्महत्या प्रकणावरून राज्यातील राजकारण तापत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यामध्ये उडी घेतली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरामध्ये त्यांनी सुशांतच्या आणि त्याच्या वडिलांच्या नात्यावर भाष्य करत वडिलांवर गंभीर आरोप केले होते. यामुळे संतापलेल्या सुशांतच्या कुटुंबीयांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानिचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांची स्तुती करताना सुशांतचे वडील के.के. सिंह यांच्या दुसऱ्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले होते. राऊत यांनी म्हटले होते की, सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते, असे वक्तव्य संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात केले होते.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतचे चुलत भाऊ भाजपा नेता नीरज सिंह बब्लू यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानिचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. असे खोटे आरोप करणं चुकीचं आहे. अफवा पसरवून संजय राऊत या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. कुटुंबावर केलेल्या या आरोपासाठी आम्ही त्यांच्यावर ठोकणार आहोत, असा इशारा नीरज सिंह यांनी हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दिला.

काय म्हणाले होते राऊत ?
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे काहीच कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हेत. त्याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावा गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईत आले, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like