सुशांतच्या आत्महत्येबाबत रियाचा भाऊ शोविकची 18 तास चौकशी !
पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीनंतर तिचा भाऊ शोविकची अमंलबजावणी संचालनालयाकडून तब्बल 18 तास चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुशांतच्या बँक अकाउंटमधून शोविकच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेल्या रकमेबाबत माहिती घेण्यात आली.
सुशांतच्या बँक अकाउंटमधून शौविकच्या अकाउंटमध्ये अनेक वेळा पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. शोविक चक्रवर्तीला ईडीने युरोप दौर्याबाबतही विचारले, यातून काही धक्कादायक माहिती समोर आली. शोविकनंतर ईडीकडून आता रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीच चक्रवर्ती यांची चौकशी केली जाणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या अँगलने ईडीकडून तपास केला जात आहे. रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल 8 तास ही चौकशी सुरू होती.