SSR Case : रिया च्रकवर्तीची चौकशी करणारे मुंबईतील पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, संपुर्ण कुटुंबाला लागण

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयच्या सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत सिंह प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी करणारे मुंबई पोलिसांचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. इतकेच नव्हे तर डीसीपी त्रिमुखे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आढळेल आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांचे डीसीपी त्रिमुखे हे सुरुवातीपासूनच प्रश्नांच्या भोवऱ्यात आहेत. अलीकडे, सुशांत सिंह प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल मीडियासमोर आल्यानंतर डीसीपी अभिषेक त्रिमुखे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात चार वेळा संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार रियाने 21 जून रोजी वांद्रा डीसीपी सोबत फोनवर 28 सेकंदपर्यंत चर्चा केली. यानंतर 22 जून रोजी डीसीपीने रियासाठी निरोप पाठविला. त्यानंतर डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी 22 रोजी फोनवर रियाशी 29 सेकंदासाठी बोलले. त्यानंतर 8 दिवसानंतर रिया चक्रवर्ती यांना डीसीपीचा फोन आला. दोघांमध्ये 66 सेकंदांपर्यंत संभाषण चालले. यानंतर काही दिवसापर्यंत दोघांनी एकमेकांशी कोणतीही चर्चा केली नाही, पण 18 जुलैला पुन्हा एकदा रियाकडून डीसीपीला फोन केला गेला. दरम्यान, फोन कॉलची माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून असे सांगितले जात होते की, जेव्हा तिला वांद्रे पोलिस स्टेशन आणि सांताक्रूझ स्टेशनला बोलावले होते तेव्हा हे कॉल रियाचे होते. रियाला निवेदन देण्यासाठी बोलविण्यात आले होते. हा फोन कॉल अधिकृत कारणास्तव केला गेला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेले. यापूर्वी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांमध्ये वाद होते. बिहार पोलिसांकडून मुंबई पोलिस योग्य तपास करत नाहीत आणि सहकार्य करत नाहीत असा आरोप होत आहेत. सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सध्या सीबीआयची टीम गेल्या आठ दिवसांपासून शहरात आहे. शुक्रवारी सीबीआयने रियाची 10 तास चौकशी केली. सीबीआयने आतापर्यंत सिद्धार्थ पिठणी, कुक नीरज सिंग आणि घरगुती सहाय्यक दीपेश सावंत यांच्यासह अनेक लोकांची चौकशी केली आहे. सीबीआयने सुशांत राजपूतचे सनदी लेखापाल संदीप श्रीधर आणि लेखापाल रजत मेवती यांचीही निवेदने नोंदविली आहेत.

दरम्यान, सीबीआय प्रकरणाचा तपास घेण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी राजपूत आत्महत्येसंदर्भात रिया चक्रवर्ती यांचे निवेदन नोंदविले होते. 14 जूनला वांद्रे येथील फ्लॅटमध्ये 34 वर्षीय अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली.