SSR Death Case : सुशांत आणि रिया यांच्यात कुटुंबावरून झालं होतं मोठं भांडण, मुंबई पोलिसांनी SC मध्ये दाखल केला स्टेटस रिपोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयच्या ताब्यात आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा स्टेट्स रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात दिला आहे. मुंबई पोलिसातील सूत्रांचे म्हणणे आहे की, मृत्यूच्या काही दिवस अगोदर सुशांतचे रिया चक्रवर्तीशी कडाक्याचे भांडण झाले होते. एकमेकांच्या कुटुंबावरून हे भांडण झाले होते. दोघांमध्ये बरीच मारामारी देखील झाली. त्यानंतरच रियाने सुशांतचा अपार्टमेंट सोडला. रियाने सुशांतचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला. यानंतर, 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमधून सापडला.

माहितीनुसार रिया चक्रवर्ती नेही आपल्या निवेदनात सांगितले आहे की, एक दिवस घरी एक पार्टी होती, ज्यामध्ये सुशांतची बहीणही आली होती. रियाने सांगितले की, पार्टी संपल्यानंतर सुशांतची बहीण अचानक तिच्या खोलीत आली आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली. रियाने आपल्या निवेदनात असेही म्हटले की तिने दुसर्‍या दिवशी सुशांतला याबद्दल सांगितले होते. पण, सुशांतने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले होते. रियाच्या या वक्तव्यानंतर मुंबई पोलिसांनी सुशांत सिंहच्या बहिणीलाही तिची बाजू जाणून घेण्यास बोलावले होते, पण सुशांतच्या बहिणीने मुंबई पोलिसांसमोर कोणतेही वक्तव्य केले नाही. ती पोलिसांसमोर आली नव्हती. या प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी आहे. कोर्टाचा आदेश मुंबई पोलिसांच्या बाजूने येईल असा मुंबई पोलिसांना विश्वास आहे.

दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालय रिया चक्रवर्तीची सतत चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी आणि त्यानंतर सोमवारी रिया, तिचा भाऊ, वडील आणि मॅनेजर यांच्याकडे चौकशी केली. आज रियाच्या सर्व व्यवहार, बचत खाती, गुंतवणूकीबद्दल प्रश्न विचारले गेले.