SSR Death Case : सुशांतच्या मानेवर होती 33 cm लांब ‘खूण’, रिपोर्टनंतर खळबळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआयची एक टीम काल मुंबईत दाखल असून त्यांना सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये सुशांतच्यामानेवर 33 सेमी लांब खूण असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सुशांतच्या गळ्यावर 33 सेमी लांब एक खूण होती. त्याची जीभ बाहेर नव्हती आली.दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती.रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या.

शरीरातील कोणतीही हाडे तुटली किंवा मोडलेली नव्हती. त्याच्या तोंडातून किंवा कानातून फेस किंवा रक्त बाहेर आले नव्हते. मात्र मानेच्या खाली 33 सेंटीमीटर लांब एक खूण होती. दोरीची खूण हनुवटीच्या खाली 8 सेमी होती. या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सीबीआयने दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांची मदत घेऊन पोस्टमार्टम अहवालाची तपासणी केली.

याआधी केलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये याचा उल्लेख नव्हता. विकास सिंह म्हणाले की, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सुशांतचा पोस्टमॉर्टम योग्य नव्हता की रिपोर्ट योग्यरित्या लिहिला गेला नाही. सीबीआयच्या तपासणीत सर्व काही स्पष्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सुशांतच्या घरातील जवळपास सर्व वस्तू गायब असल्यामुळे सीबीआय अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.