SSR Death Case : SC च्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टानेही आज महत्त्वाचा निकाल देत मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे देण्यास सांगितले आहे. तसेच तपासामध्ये सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमीबर सिंह यांनी सांगितले, सर्वोच्च न्यायालयाची आदेश प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू. त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयातील आमच्या वकिलांशी चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे षडयंत्र

मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत प्रामाणिकपणे केला आहे. त्याची प्रतिष्ठा जगभरात आहे. मुंबई पोलिसांनी आपल्याच राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचे खच्चीकरण करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयानं एकदा निर्णय दिल्यानंतर त्यावर राजकीय टिप्पणी करणं योग्य नाही, असं राऊत म्हणाले.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्य म्हटले आहे की, सुशांत सिंह केस सीबीआयकडे सोपवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद. आता कडक ताशेऱ्यानंतर तरी गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची हाकालपट्टी करुन त्यांच्यासह संबंधित पोलिसांची सीबीआय चौकशी करावी. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता याची ही चौकशी व्हावी, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.