सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, काय आहे वायरल होत असलेल्या काळ्या बॅगचे ‘रहस्य’ ? जाणून घ्या

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू 14 जूनला झाला होता. त्या दिवसाच्या काही वायरल व्हिडिओमध्ये हा दावा केला जात आहे की, पोलिसांच्या उपस्थितीत एक व्यक्ती संशयित काळी बॅग घेऊन रूमच्या बाहेर आला आणि तेव्हापासून ती बॅग गायब आहे.

वायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेली एक व्यक्ती आणि एक महिला संशयित असल्याचे सांगितले जात आहे. दावा केला जात आहे की, या काळ्या बॅगमध्ये पुरावे होते जे गायब केले गेले. 14 जूनला सुशांतच्या रूमध्ये बनवण्यात आलेल्या व्हिडिओत काळ्या कपड्यातील एक माणूस सुशांतच्या मृतदेहाजवळ काळी बॅग हातात घेऊन उभा असलेला दिसत आहे. त्याने लाइट पिंक कलरची कॅप घातली होती. हा माणूस बॅग घेऊन जिना उतरताना सुद्धा दिसत आहे.

या व्हिडिओत ब्लू आणि व्हाइट रंगाचा स्ट्रिप्ड शर्ट घातलेली एक मुलगी सुद्धा सुशांतच्या बिल्डिंग कम्पाऊंडमध्ये धावताना दिसत आहे. ती जाऊन या ब्लॅक ड्रेसवाल्या व्यक्तीला भेटते आणि काहीतरी सांगते. यानंतर ब्लॅक ड्रेसवाल्या व्यक्तीच्या हातातील काळी बॅग गायब झाल्याचे दिसत आहे. विशेष बाब ही आहे की, ज्यावेळी हे सर्व होत होते, तेव्हा मुंबई पोलीससुद्धा तेथे उपस्थित होते.

एबीपी न्यूजने यासंबंधी पडताणी करून काळ्या बॅगच्या रहस्यावरील पडदा उघडला आहे. एबीपी न्यूजने म्हटले आहे की, ही काळी बॅग नसून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ठेवलेली रेग्झीन पोर्टेबल बॅग आहे. या बॅगचा उपयोग डेड बॉडी अ‍ॅम्ब्युलन्सपर्यंत घेऊन जाण्यासाठी केला जातो, जेथे स्ट्रेचर जाऊ शकत नाही.

सुशांतचा डुप्लेक्स फ्लॅट माऊंट ब्लँकच्या 6व्या मजल्यावर आहे, जेथे स्ट्रेचर लिफ्ट किंवा जिन्याने घेऊन जाणे शक्य नव्हते. ही रेग्झीन पोर्टेबल बॅग पकडणारा व्यक्ती अ‍ॅम्ब्युलन्स चालक आहे, जो मृतदेह 6व्या मजल्यावरून ग्राऊंड फ्लोअरपर्यंत आणण्यासाठी रूममध्ये गेला होता. ब्लू टी-शर्ट वाली मुलगी शौविकची मैत्रिण असल्याचे सांगितले जात आहे, जी मृत्यूचे वृत्त ऐकून पळत सोसायटीत मीडियाच्या समोर आत जाताना दिसत आहे.

अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक आणि काळ्या कपड्यात दिसणार्‍या तरूणाचा भाऊ विशालने हे सत्य सांगितल्याचे एबीपी न्यूजने म्हटले आहे. विशालने सांगितले की, पोलिसांनी मतदेह अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ठेवून कूपर हॉस्पीटलमध्ये पोहचवण्याचे निर्देश दिले होते. पोर्टेबल रेग्झीन बॅग मृतदेह उचलण्यासाठी वापरली जाते. त्या दिवशी 2 अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी आल्या होत्या. पहिल्या अ‍ॅम्ब्युलन्सचा स्ट्रेचर खराब झाला होता आणि त्यावर मृतदेह फिट होत नव्हता, ज्यानंतर दुसरी अ‍ॅम्ब्युलन्स मागवण्यात आली.

अ‍ॅम्ब्युलन्स चालक विशालने सांगितले की, त्यांना सोशल मीडिया आणि फोनवर धमक्या येत आहेत आणि याची लेखी तक्रार ते मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडे नोंदवणार आहेत.