SSR Death Case : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात पाटण्यात तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय कडून सुरु करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या जवळील व्यक्ती रोज त्याच्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. तसेच काही दिवसांपासून या प्रकरणावर अनेक व्यक्तींकडून वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी देखील काही वक्तव्ये केली होती. तसेच यावर लिखाणही केले होते. आता या प्रकरणात संजय राऊत यांच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

एचएएमचे प्रवक्ते दिनेश रिझवान यांनी पाटणा पोलिसांकडे एक ईमेल लिहून ही तक्रार दाखल केली आहे. यामध्ये संजय राऊत यांच्या शिवाय मुंबई महानगर पालिकेच्या महापौर, पालिका पदाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या तक्रारीमध्ये तपास आणि त्यांच्या अटकेची मागणीही करण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरामध्ये सुशांत सिंह आणि त्याच्या वडिलांबाबत लिखाण केले होते. राऊत यांनी सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे त्याचे आणि त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते असे राऊत म्हणाले होते. तसेच त्यांनी अंकिता आणि सुशांतच्या ब्रेकअप विषयी देखील वक्तव्य केले होते. दुसरीकडे महाराष्ट्र आणि बिहार सरकारही आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. बिहार सरकारने सीबीआयची मागणी केली तर ही आत्महत्या मुंबईत झाली असल्याचे सांगत बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नसल्याचे महाराष्ट्र पोलिसांचे म्हणणे आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरच्यांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुले रियावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीने तिची दोन वेळा चौकशी केली. या चौकशी दरम्यान, रियाचे फोन कॉल्स डिटेल्स समोर आले. यात रियाने एयू या व्यक्तीला जवळपास 63 वेळा फोन केल्याचे आढळून आले. याप्रकरणी रियाच्या टीमने एयू ही व्यक्ती रियाची मैत्रीण असल्याचे म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like